अकोला (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषद संलग्नित अकोला जिल्हा पत्रकार संघा’या वतीने येत्या ६ जानेवारी २०२० रोजी स्थानिक निमवाडी परिसरातील पत्रकार भवन येथे सकाळी ११.३० वाजता पत्रकार दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आद्य पत्रकार, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यां’या स्मृतित ६ जानेवारी हा दिवस रा’यभर पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. परंपरेनुसार अकोला जिल्हा पत्रकार संघाने यावर्षी देखील पत्रकार दिन समारंभ आयोजीत केला आहे. या सोहळ्या’या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा हे राहणार आहेत.
प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकरी डॉ. मिलींद दुसाने हे समारंभाला उपस्थित राहतील. या सोहळ्याला अकोला महानगरातील सर्व पत्रकार बंधु-भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मिरसाहेब, सरचिटनीस प्रमोद लाजुरकर, चिटणीस संजय खांडेकर यांनी केले आहे. जिल्हा पत्रकार संघा’या सर्व तालुका शाखा आपल्या तालुका स्थळावर हा पत्रकार दिन साजरा करणार आहेत.