वाडेगाव(डॉ शेख चांद)- दिनांक २७ नौव्हेंबर पासून सुरू असलेल्या अॅड सुबोध डोंगरे व संतोष डोंगरे यांच्या उपोषणाची दखल शासना कडून घेण्यात आली असल्याचे पत्र उपोषण कर्ते अॅड सुबोध डोंगरे व संतोष डोंगरे यांना दिनाक २९ ला देण्यात आले . या पत्रात मौजा वाडेगांव येथील अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत, तसेच संदर्भिय विषयान्वये आपण ग्रामपंचायात कार्यालय वाडेगाव समोर दि. २७ /११ /२०१९ पासून उपोषण सुरू केलेले आहे, तरी आपले पत्रा नुसार प्रस्ताव मा . उपविभागीय अधिकारी तथा अध्यक्ष शक्ती प्रदत्त समीती बाळापूर यांचेकडे पत्र क्र. ३१९७ / १९ दि २७ नुसार सादर केले असून त्यांच्याशी चर्चा केली असता सदर नियमानुकुल बाबत कार्यवाही ताबडतोब करण्यात येईल असे सांगीतले, त्यानुषंगाने उपोषण कर्ते अॅड सुबोध डोंगरे व संतोष डोंगरे यांना पत्र देऊन उपोषण सोडविण्यात आले.
यावेळी बि.डी.ओ. समाधान वाघ, विस्तार अधिकारी पी .जी. नाकट, कक्ष अधिकारी प्रदीप काळे, प्रशांत मानकर, ग्रामविकास अधिकारी डी .एस. अंभोरे, मो . अफ्तार ठेकेदार, अरूण पळसकार, शामलाल लोध, अय्याज साहील, मायाताई लोध, संजय तायडे, राजवर्धन डोंगरे, दयाराम डोंगरे, वाय एस पठाण, रंजीत अहीर, सागर सरप, दिनेश धाडसे, दत्ता मानकर,डॉ एस चांद, गौतम डोंगरे, भारत डोंगरे, जितेंद्र डोंगरे , मंगेश तायडे, तसेच इतर पदाधीकारी, सामाजीक कार्यकर्ते , युवक, महिला मोठया संखये ने उपस्थीत होते.