तेल्हारा (प्रतिनिधी)- स्थानिक इंदिरा नगर मध्ये अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाल्यामुळे ति दूर करण्यासाठी नगराध्यक्ष सह अधिकाऱ्यांना वारंवार मागणी करून सुद्धा पाण्याची समस्या दूर न झाल्यामुळे ८ नोव्हेंबर ला तेल्हारा नगरपालिकेच्या भाजपा नगरसेविका सौ.आरती गजानन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली इंदिरा नगर मधील शेकडो नागरिकांनी घागर मोर्चा काढून माहिती असतांना सुद्धा गैरहजर राहलेल्या नगराध्यक्षा जयश्री पुंडकर व मुख्याधिकारी मनोहर अकोटकार यांच्या खुर्चीला हार घालून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी संतप्त झालेल्या मोर्चेकरांनी नगरपालिकेत घागरी फोडून चिखल फेकल्याचे दिसून आले. तसेच भाजपा नगर सेविकेच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्च्याला भाजपा सहित इतर सत्ताधारी नगर सेवकांनी उपस्थित राहून समर्थन दर्शविल्याने भाजपा नगराध्यक्षांना हा घरचा अहेर समजल्या जात असून पालिकेचा कारभार किती ढेपाडला हे यावरून दिसून येते. संतप्त झालेल्या मोर्चेकरांना सांभाळण्यासाठी पोलिसांना यावेळी मोठी कसरत करावी लागली.
तेल्हारा शहरा मधील प्रभाग क्र.८ मधील इंदिरा नगर मध्ये पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाल्यामुळे तेल्हारा नगरपरिषदला वारंवार तोंडी सांगून, विनंती अर्ज करून, स्मरण पत्र देऊन सुद्धा पाणी समस्या दूर झाली नाही या बाबत एक महिन्यापूर्वीच नगर परिषद मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, यांना मोर्च्या काढण्या बाबत माहिती दिली होती व कोणतीही कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता तरी सुध्दा नगर पालिकेने इंदिरा नगर मधील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर न केल्यामुळे ८ नोव्हेबर ला तेल्हारा पालिकेवर इंदिरा नगर मधील संतप्त झालेल्या शेकडो नागरिकांनी मोर्चा काढून पालिकेच्या कारभाराचा निषेध करून नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांना पाण्याच्या समस्यांबाबत मोर्च्या येणार याची माहिती असून सुद्धा ते जाणीवपूर्वक गैरहजर राहिल्याने मोर्चेकर्यांनी नगराध्यक्षासह मुख्याधिकारी यांच्या खुर्चीला हार घालून यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
तसेच सोबत आणलेल्या घाग्रीमधील चिखल मुख्याधिकारी यांच्या दालनात फेकण्यात आला. यावेळी संतप्त झालेल्या मोर्चेकऱ्यांनी पालिकेच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून आपल्या रास्त मागण्यांसाठी उग्ररूप धारण केल्यामुळे संतप्त झालेल्या मोर्चेकऱ्यांना सांभाळतांना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. इंदिरा नगर मधील नागरिकांनी निर्माण झालेली भीषण पाणी टंचाई दूर करण्याबाबत नगराध्यक्षांसह अधिकाऱ्यांकडे एक महिन्यापूर्वी पासून मागणी करून सुद्धा अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे अखेर संतप्त झालेल्या इंदिरा नगरवासियांनी इंदिरा नगरमधून मोर्चाला सुरुवात करून तेल्हारा नगर पालिकेवर घागर मोर्चा आणण्यात आला.
तेल्हारा नगर परिषद मध्ये भाजपा व शेतकरी पॅनलची पूर्ण बहुमताची सत्ता असून नगराध्यक्षा भाजपच्या असतांना सुद्धा भाजपा नगर सेविकेला आपल्या रास्त मागण्यांसाठी वारंवार निवेदन देवून मोर्चा काढावा लागतो यावरून नगराध्यक्षांच्या काम करण्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यावेळी भाजपा नगर सेविकेला मोर्चाबाबत भाजपच्या इतर तीन नगरसेवकांसह सत्तेतील काही नगर सेवकांनी समर्थन केल्यामुळे हा भाजपा नगराध्यक्षांना घरचा आहेर मानल्या जातो.तेल्हारा शहरामध्ये तीन वर्षापूर्वी वाढीव पाणीपुरवठा योजनेंतर्गत वानच्या पाण्यामधून अनेक भागांमध्ये दोन वेळा पाणीपुरवठा केल्या जात होता. परंतु आता मात्र एकवेळाच पाणी दिल्या जात असतांना सुद्धा इंदिरा नगरासह इतर भागात पाण्याची समस्या निर्माण होत असल्यामुळे नगर पालिकेचे नियोजन कोडमडल्याचे दिसून येत आहे. यावरून नागरिकांच्या पिण्याच्या गंभीर प्रश्न सोडून नगर पालिकेचे अधिकारी पदाधिकारी कोणत्या कामात गुंतलेले आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे. काढण्यात आलेल्या मोर्च्यामध्ये महिला पुरूषांसह लहानमुले सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.