पातूर(सुनिल गाडगे): आक्टोंबर महिन्यात सरासरी पेक्षा ३० टक्के जास्त पाऊस आल्यामुळे पातुर शेतक-यांच्या हाती आलेले सोयाबिन कपासी ज्वारी मुंग उडीद तुर मका तसेच फळबाग पिकांची मोठ्या प्रमाणात हानी होऊन शेतकरी हवालदिल झाला होता.
शासनाने नुकसानी झालेल्या क्षेत्राचे पिक निहाय पंचनामे सर्व्हे बाबत अमलबजावणीचा आदेश देण्यात आले होते आदेशाचे पालन करून कृषी खात्याचे व महसूल खात्याचे कर्मचारी कामला लागले.
वेळेची तमा न बाळगता नेसर्गिक आपत्ती मुळे झालेल्या पिकाचे नुकसानीचा पंचनामा शेतकऱ्यांच्या समक्ष कृषी सहाय्यक ऐन टी हिरोडकर साहेब , सरकटेसाहेब ,तलाठी पठाणसाहेब , तलाठी हेडाऊसाहेब , यांनी मौजे (पातूर भाग ३)(पातुर भाग 2)( सोतलवण) (आगेखेड)( बोडखा) पंचनामे चे काम 100 टक्के केले असून सर्वे अर्ज जमा करण्यात आले आहेत.
तसेच विमा काढलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज गोळा करून विमा कंपनी ऑफिस कडे देण्याचे काम सुरु आहे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानी पंचनाम्याचे काम पूर्ण झाल्या मुले शेतकर्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक होत आहे.आता फक्त लक्ष्य आहे ते सरकारी मदती कडे.