• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

विवाह संस्कारातून सदृढ समाज घडतो – डाॕ रणजित सपकाळ

adil by adil
May 28, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, कार्यक्रम, फिचर्ड
Reading Time: 1 min read
79 1
0
विवाह संस्कारातून सदृढ समाज घडतो – डाॕ रणजित सपकाळ
11
SHARES
573
VIEWS
FBWhatsappTelegram

आकोट(देवानंद खिरकर)- विवाह हा एक संस्कार आहे.भारतीय संस्कृती व परंपरेने दिलेला हा संस्कारातूनच कुटुंब समाज घडत असतो.त्यातून सदृढ राष्ट्र निर्माण होते.विवाह संस्कार रुजविण्यासाठी गुरुवर्य वासुदेव महाराजांनी आयुष्यभर प्रबोधन केले तोच वारसा मध्यस्थी मंडळ पुढे निष्ठेने चालवित आहे.मध्यस्थी कार्य समाजाभिमुख झाले आहे असे प्रतिपादन अकोला मराठा मंडळाचे अध्यक्ष डाॕ रणजित सपकाळ यांनी येथे केले.*

मध्यस्थी वधू-वर सुचक मंडळ आकोट द्वारा आयोजित वधू-वर परिचय मेळाव्यात डाॕ.रणजित सपकाळ बोलत होते.अध्यक्षस्थानी श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. वासुदेवराव महाराज महल्ले होते.याप्रसंगी समाज सुधारक जेष्ठ नेते महादेवराव भुईभार, सहकार नेते रमेश हिंगणकर, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश महासचिव पुनम पारसकर, दर्यापूरचे दिनकरराव गायगोले, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी अशोकराव अमानकर,डाॕ.अमोल रावणकार,सुधीर ढोणे, कविवर्य निलेश म्हसाये, वैभव टेकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

मध्यस्थी वधू-वर परिचय मेळाव्याला राज्यातून मोठ्या संख्येने विवाह इच्छूक युवक-युवती व त्यांचे पालकांनी हजेरी लावून उत्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी पुनम पारसकर यांनी सामाजिक सद्यःस्थितीवर प्रकाश टाकून उपस्थितांचे उद् बोधन केले.मुला मुलींनी भविष्यातील स्वप्न जरुर बघावे परंतू वास्तवाचे भान ठेवावे. अपेक्षा आणि महत्वाकांक्षेच्या ओझ्याखाली कुटुंब व्यवस्था विस्कळीत झाल्याची खंत त्यांनी आपल्या ओजस्वी भाषणात व्यक्त केली. गुरुमाऊली’ वासुदेव महाराजांचे विचार आचरणात आणून विवाहातील अवडंबर थांबले पाहीजेत.अनाठायी खर्च,मुहूर्त,कर्मकांड आणि मोठेपणाच्या आहारी न जाता आदर्श व सामुहिक विवाह घडवून आणा.असा हितोपदेश समाजसुधारक महादेवराव भुईभार यांनी केला.यावेळी रमेश हिंगणकर, प्राचार्य वसंतराव घिवे. बाळकृष्ण आमले यांची समायोचित भाषणे झालीत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव सुरेशदादा कराळे यांनी केले.मध्यस्थी मंडळाच्या कार्याचा आढावा देत अध्यक्ष बाळासाहेब फोकमारे यांनी समाज बांधवांशी संवाद साधला.

परिचय सत्रात राज्यातून आलेल्या विविध स्तरातील युवक-युवतींनी आपला परिचय दिला. मंडळाकडे ४३७ युवक-युवतींची नोंदणी झाली.

कार्यक्रमाचे संचालन सौ.ज्योतीताई कुकडे, व सौ. शोभाताई म्हैसणे यांनी तर आभार प्रदर्शन मंडळाचे कोषाध्यक्ष जयकृष्ण वाकोडे यांनी केले.

मेळाव्याला सहकार नेते मोहनरव जायले,शंकरराव चौधरी,शेषराव वसु डाॕ.राजेश नागमते,कॕप्टन सुनिल डोबाळे, राजदत्त मानकर,संस्थेचे कोषाध्यक्ष पुरुषोत्तम लाजुरकर,सचिव रविंद्र वानखडे, सदाशिवराव पोटे, दिलिपराव हरणे, प्राचार्य गजानन चोपडे, महादेवराव सावरकर, नागोराव वानखडे, भाष्करराव डिक्कर, मधुकरराव पुंडकर, सौ.वृंदाताई मंगळे प्रा.साहेबराव मंगळे, रामदास मंगळे, गजानन वालसिंगे प्रकाशराव राउत कारंजा. अमृत पाटील वाघ खामगाव. अशोकराव बुरघाटे यवतमाळ. बाळासाहेब रावनकर अकोला.ज्ञानदेवराव वनारे अकोला. पाथरे सर दर्यापुर. बाळासाहेब रावनकर अकोला. डी.ओ.म्हैसणे, प्रकाश फुके, श्रीराम झापे, विठ्ठल मंगळे, श्रीहरी मंगळे, बाबुराव देशमुख, माधवराव ताथोड, विनायकराव कुकडे, सुधाकरराव हिंगणकर, रत्नाकर रेळे, बंडू कुलट, गजानन महल्ले, राममुर्ती वालसिंगे, मनोज लोडम, पुणे, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा कारंजा,मलाकापूर,नांदुरा,खामगांव,बुलढाणा,कारंजा,मंगरुळ,परतवाडा,अंजनगांव,दर्यापूर, तेल्हारा येथील मंडळाचे समन्वयक व कार्यकर्ते तथा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

शेतातील नुकसानभरपाईच्या लाभासाठी शेतकऱ्याची धावाधाव

Next Post

पालकमंत्री ना.डॉ.रणजीत पाटील यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
पालकमंत्री ना.डॉ. रणजीत पाटील

पालकमंत्री ना.डॉ.रणजीत पाटील यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

बाबासाहेब धाबेकर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी जलसंधारण मंत्री बाबासाहेब धाबेकर यांचे आज मुंबईत दीर्घ आजाराने निधन

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.