अकोट प्रतिनिधी (देवानंद खिरकर) –
अकोट तालुक्यात आक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार परतीचा जोरदार पाऊस कोसळला. या पावसामुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्याची भरपाई पीक विमा योजनेच्या माध्यमातून मिळावी यासाठी अर्ज करण्याच्या हेतूने अकोट तालुक्यातील शेतकरी अकोट शहरातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात गर्दी करीत आहे. परतीच्या पावसामुळे गाव व परिसरातील अनेक शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीन, ज्वारी व कपाशी पिकांचे नुकसान झाले आहे. या शेतकरयांनी पिकाचा विमा उतरविला होता.
यामाध्यमातून त्यांना नुकसानभरपाई मिळू शकते. त्याकरिता तालुका कृषी अधिकारी कार्यालयात नुकसान झाल्याच्या ७२ तासांत लेखी अर्ज करने आवश्यक आहे. त्यामुळे येथील शेतकरी नैसर्गिक संकट कोसळल्याने अर्ज देण्यासाठी अकोट तालुक्यातील कृषी अधिकारी कार्यालय गाठत आहे. एकाचवेळी असंख्य शेतकरी पीक नुकसानभरपाईसाठी अर्ज करण्याच्या हेतूने कार्यालयात धडकत असल्याने दिसुन येते आहे.