दानापूर(सुनील धुरडे)- येथील आराध्य दैवत असलेली आई भवानीची पालखी ही दरवर्षीप्रमाणे या वर्षी मोठ्या उत्साहाने विजया दशमि च्या म्हणजे दसर्याच्या दिवशी दर्ग्यात जाते.
परंपरे नुसार ढोलचे भजन, गुरुदेव सेवा भजन मंडळी याच्यां भाजनाने पालखी ची मिरवणूक काढण्यात आली.
या वेळी गावातील प्रत्येकाच्या घरा पुढे रांगोळी काढून पालखीचे स्वागत करण्यात आले.व पालखीचे पूजन करण्यात आले.
या पालखी सोहळ्याची चहा पानची व्यवस्था श्री खोडे प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आली होती. आई भवानीची पालखी सीमोल्लंघ ना साठी गावाच्या दक्षिण दिशेला सेमी व आपट्याच्या च्या वृक्षा खाली ठेऊन आई भवानीची आरती करून लोक सोन व चांदी घेऊन गावात दर्शनासाठी फिरतात व परतीच्या मार्गाला आई भवानीची पालखी व सर्व गावकरी हे मिया साहेबांचा दर्ग्यात जातात व त्या ठिकाणी आई भवानीची आरती ही मंदिराचे अध्यक्ष विश्वासराव विखे याच्यां हस्ते आरती करून दर्ग्यात असलेल्या मिया साहेबांच्या व त्यांच्या गुरू च्या समाधीला सोने, चांदी अर्पण करून दर्शन घेतात.आई भवानीची पालखी पुढे मार्गस्थ होत मंदिरात महाआरती होऊन पालखी सोहळा समाप्त होते.
व लोक दर्शनासाठी घरो घरी निघून जातात.
*शेकडो वर्षची परंपरा* आजही चालू असलेल्या या पालखी सोहळ्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे .
या दर्ग्यात मिया साहेब व मानसिंग व त्यांचे गुरू यांच्या समाधी आहेत.
मिया साहेब हे सोनाला ता संग्रामपूर तर अकोट येथील नर्सिंग महाराज यांचे गुरुबंधू होते .संत सोनाजी महाराज हे मिया साहेब यांच्या भेटीला दानापूर येथे येत असत असा उल्लेख संत सोनाजी महाराज यांच्या ग्रथात आहे.
*हिवरखेड पोलिसानी ठेवला तगडा बंदोबस्त*
या वेळी अकोट चे एस, डी, पी, ओ सुनील सोनवणे, हिवरखेड चे ठाणेदार आशिष लव्हनगडे, पी, एस, आय, वाणी, मुंढे, संतोष सुरवाडे, गितेश कामले, आकाश राठोड, दीपक गवई, पोलिस पाटील संतोष माकोडे,उस्मान शहा,बिसमीला शहा ,पत्रकार मंडळी , तेल्हारा पोलीस, अकोट पोलीस, दहीहंडा पोलीस उपस्थित होते.