दानापूर (सुनीलकुमार धुरडे)- तेल्हारा तालुक्यातील दानापूर प्रथमिक आरोग्य केंद्र वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असणाऱ्या या आरोग्य केंद्राला आता मुखायल्यात राहणाऱ्या डॉक्टर ची आता गरज निर्माण झाली आहे. दानापूर प्राथमिक आरोग्य केंद्र हे तालुक्यातील दुसऱ्या क्रमांका चे आरोग्य केंद्र आहे. त्यामुळे या ठिकाणी दररोज रुग्णाची मोठ्या प्रमाणावर तपासणी केली जाते. मात्र रात्रीच्या वेळी या आरोग्य केंद्रत डॉक्टर हजर नसल्याने रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच आज वारी हनुमान येथील पुनर्वसित नागरतास येथील सरपंच जया यांचे वडील गजानन पाठक यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असतांना दवाखान्यात डॉक्टर नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. आज ही घटना घडली त्यावेळी चार कर्मचारी कर्तव्यावर उपस्थित होते. मात्र अशीच परिस्थिती जर कायम राहिली तर डॉ नसल्याने या ठिकाणी आणखी घटना घडू शकतात.
शिवाय या आरोग्य केंद्रात आज एकही नर्स नसल्याने स्त्री रुग्णाची तपासणी कोणी करावी हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या गोष्टीची दखल घेऊन या ठिकाणी मुख्यालयात राहणाऱ्या डॉक्टर ची नियुक्ती करावी अशी जनतेतून मागणी होत आहे. दानापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भरवश्यावर 42 हजार ग्रामस्थाचे आरोग्य अवलंबून आहे. त्याच बरोबर या प्राथमिक आरोग्य केंद्रात 32 गावे येतात. यामध्ये 8 गावे ही आदिवासी भागातील आहेत यामध्ये भारुड खेडा, नांगर तास, चांदनपूर, मोहपाणी आदी गावाचा समावेश आहे. या आरोग्य केंद्राला 7 उप केंद्र संलग्नित आहेत, 42 हजार 275 लोकांच्या आरोग्याचा कारभार या आरोग्य केंद्राच्या भरवश्यावर चालतो.मात्र या ठिकाणी डॉ मुख्यालयात राहत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्याच बरोबर या आरोग्य केंद्रात ओ. पी. डी. करण्या साठी बाहेरील आरोग्य केंद्राचे कर्मचारी बोलवावे लागतात ही मोठी शोकांतिका आहे. या आरोग्य केंद्रात एकूण 39 पदे आहेत त्यापैकी 22 पदे ही भरलेली आहे.हिवताप कार्यालया मार्फत 4 आरोग्य पदे आहेत ही अद्यापही रिक्त आहेत ,जिल्हा परिषद आरोग्य विभागतिल 3पैकी 1 पद हे भरलेले आहे .मात्र या पैकी फक्त 3 परिचर , 1 आरोग्य सहहायक , व 1 डॉक्टर अशी एकूण 5 पदे भरलेली आहेत. त्यातच सतत चालू असलेल्या पाऊसाने साथीचे रोग वाढल्याने येथे रुग्णाची मोठी गर्दी असते.
सफाई कामगार नाही. या आरोग्य केंद्रात सफाई कामगार नसल्याने येथे सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले.
औषध निर्माण अधिकारी नाही. या प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज 300 लोकांची ओ, पी, डी होते. मात्र या आरोग्य केंद्रात औषधं निर्माण अधिकारी नसण्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.
बाईट::
1) मी वरिष्ठांना कळविले आहे माझं बाळ लहान असल्यामुळे मी मुख्यालयात राहू शकत नाही व या आरोग्य केंद्रात 2 डॉ च्या पोस्टिंग आहेत व मलाच सर्व सांभाळावे लागते.
डॉ. नीलिमा डाबेराव
वैद्यकीय अधिकारी दानापूर.
2) मी डॉ ला मुख्यालयात राहण्याच्या सूचना दिल्या आहेत ,जे अधिकारी मुख्यालयात राहत नसतील त्याच्यावर कार्यवाही
डॉ. प्रवीण चव्हाण
ता. वैद्यकीय अधिकारी तेल्हारा.