• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सस्पेन्स संपला! अमित शहांच्या उपस्थितीत उदयनराजे भोसले यांचा भाजपात प्रवेश

City Reporter by City Reporter
May 28, 2020
in Featured, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
79 1
0
udayana-raje-bhosle bjp amit shah
11
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वशंज व राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आपला खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांच्याकडून लगेच तो मंजूर करण्यात आला. त्यानंतर आज सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आजवरचा सर्वात मोठा भूकंप झाला असून, राष्ट्रवादीची सातारा जिल्ह्यात पडझड होणार आहे.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

”राजे शिवछत्रपतींचा आदर्श व आशीर्वाद घेऊन आजपर्यंत रयतेसाठी काम करत राहिलो. हीच परंपरा यापुढे ही मोठ्या हिंमतीने चालवण्याची शक्ती आम्हास रयतेकडून मिळते, हीच प्रेमाची साथ व आशीर्वाद सदैव पाठीशी राहो हीच मनोमन इच्छा. तुमच्यासाठी कालही होतो, आजही आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत असेन..”असेही उदयनराजेंनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.

काल, उदयनराजे पुणे विमानतळावरून दिल्लीला रवाना झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीश महाजन होते.

गेले अनेक दिवस उदयनराजे पक्षांतरामुळे चर्चेत होते. मात्र, तळ्यातमळ्यात त्यांची अवस्था होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ते दोन वेळा भेटले. त्यानंतरही त्यांचा भाजप प्रवेशाचा निर्णय होत नव्हता. उदयनराजे व भाजप यांच्यामध्ये अटी, शर्तींची चर्चाही सुरू होती. त्यानंतर उदयनराजेंनी शेवटचे धक्कातंत्र वापरत माधव बागेत जाऊन शरद पवारांची भेट घेतली. या भेटीत शरद पवार, उदयनराजे यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद आ. शशिकांत शिंदे हेही यावेळी उपस्थित होते. पवारांना भेटत त्यांचे आशीर्वाद घेऊन उदयनराजे बाहेर पडले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी त्यांचे फोनवर बोलणे झाले आणि दि. १४ सप्टेंबरचा मुहूर्त निघाला. धक्कातंत्रात माहीर असलेल्या उदयनराजेंनी शुक्रवारी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरीने थेट दिल्ली गाठली.

बघा लाइव्ह

 

Previous Post

उद्या वानच्या पाण्यासाठी तेल्हाऱ्यात भव्य बैलबंडी मोर्चा,शेतकरी आक्रमक

Next Post

पातूर येथील गणपती उत्सव मिरवणूकीचाशांततेत समारोप

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
patur-ganpati-mandal

पातूर येथील गणपती उत्सव मिरवणूकीचाशांततेत समारोप

vidhansabha 2019

महाराष्ट्रातील पहिल्या विधानसभेच्या निवडणुक महासंग्रामचा मागोवा

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.