नवी दिल्ली : तुमचा चोरी झालेला मोबाईल फोन सापडून देण्यासाठी आता केंद्र सरकार मदत करणार आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद आज राज्यात एक वेब पोर्टल लाँच करणार आहेत. ज्याठिकाणी तुम्ही तुमचा मोबाईल हरवल्याची तक्रार करू शकता. सध्या हि योजना महाराष्ट्र राज्यापुरती मर्यादित असून लवकरच संपूर्ण देशभर सेवा पुरवली जाणार असल्याचे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.
अशा प्रकारे करेल काम –
तुमचा फोन चोरी झाल्यास किंवा हरवल्यास तुम्हाला सुरुवातीला एफआयआर नोंद करावी लागणार आहे. त्याचबरोबर 14422 या क्रमांकावर फोन करून डिपार्टमेंट ऑफ टेलीकॉमला माहिती द्यावी लागणार आहे. त्यानंतर ते तुमचा IMEI नंबर ब्लॉक करतील. त्यामुळे तुमच्या फोनमध्ये कोणत्याही प्रकारचे नेटवर्क मिळणार नाही. त्याचबरोबर त्याला तो मोबाईल कोणत्याही प्रकारे वापरात येणार नाही.
15 कोटी रुपयांत तयार CEIR –
दूरसंचार विभागाने 2017 मध्ये C-DoT ला सेंट्रल इक्विपमेंट आइडेंटिटी रजिस्टर नावाचा मोबाईल ट्रॅकिंग प्रोजेक्ट सोपवला होता. यामध्ये IMEI नंबरचा संपूर्ण डेटा असणार आहे. 15 कोटी रुपये खर्च करून शासनाने हा प्रोजेक्ट तयार केला आहे.
सिम कार्ड बदलल्यानंतर देखील काम करणार नाही –
CEIR सिस्टीम चोरी किंवा हरवलेल्या फोनवर कोणत्याही प्रकारची सेवा चालू देणार नाही. तुम्ही जुने सिमकार्ड काढून नवीन टाकले तरीदेखील त्या मोबाईलवर तुम्हाला काहीही करता येणार नाही.
जुलैमध्ये सुरु झाली ट्रायल –
C-DoT ने जुलै मध्ये या प्रोजेक्टची सुरुवात केली होती. त्यानंतर आता याला राष्ट्रीय पातळीवर रावबवण्यात येणार आहे. मोबाईल चोरी केवळ आर्थिक हानी नाही तर व्यक्तीच्या अनेक खासगी गोष्टी देखील यामध्ये असल्याने खासगी जीवनाला देखील धोका निर्माण होतो.
Comments 1