वाडेगाव (डॉ. चांद शेख)- जंगलात राहणारा एरवी नागरिकांच्या वस्तीत कधीं न आढळणारा मसण्याऊद हा प्राणी दोन पिल्लासह डॉ. निलेश घाटोळ यांच्या क्लिनिकच्या मागच्या खोलीच्या वरच्या मजल्यावर गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान रिकाम्या बॉक्समध्ये आढळला यावेळी वनविभागाच्या कर्मचा-यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले असता त्यांनी मसण्याऊदाला ताब्यात घेऊन अकोला येथे घेऊन गेले यावेळी दुर्मिळ असलेल्या मसण्याऊदाला बघण्यासाठी एकच गर्दी झाली होती.
वाडेगाव येथील डॉ निलेश घाटोळ यांच्या क्लिनिकच्या मागच्या खोलीच्या वरच्या मजल्यावर डॉ निलेश घाटोळ यांना गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान रिकाम्या बॉक्समध्ये दोन पिलासह मसण्याऊद आढळला हि बातमी गावात पसरताच जगंली माजरीप्रमाने दिसनाऱ्या या दुर्मिळ प्राण्याला पाहण्यासाठी एकच गर्दी झाली. मसण्याऊद हा प्राणी मांसाहारी असून रंगाने काळा असतो त्याच्या पायाला मजबूत असे नखे असतात. समोरच्या दोन पायाच्या नखानी तो माती उकरतो व मागच्या दोन पायांनी माती बाहेर फेकतो माणसाचा मृतदेह जर एखाद्या ठिकाणी गाडला असेल तर त्याला पूर्णपणे उकरण्याची ताकत या मसण्याऊदामध्ये असल्याचे जाणकार सांगतात. त्यामुळे ज्या ठिकाणी मनुष्याचा मृतदेह गाडला जातो त्या ठिकाणी प्रामुख्याने हा प्राणी आढळतो.
याबाबत मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांनी माहिती देताना सांगितले की, मसण्याऊद हा पाणी स्वच्छता दूत असून तो स्मशानभूमीतील मासाचे तुकडे खाऊन आपले पोट भरतो. हा प्राणी झाडावर आढळतो. या प्राण्याचा रंग काळा राहत असुन त्याचे डोळे चमकतात त्यामुळे लोक त्याला भूत समजतात, अशी माहिती काळने यांनी दिली. दरम्यान वाय एस पठाण यांनी वनविभागाला याबाबत माहिती देऊन पाचारण केले असता मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे,अकोला वनविभागाचे वनरक्षक पी आर सरप, चालक अनिल चौधरी, मजूर निलेश खंडारे, अष्टपाल उपरर्वट यांनी घटनास्थळी येऊन मसण्याऊदाला ताब्यात घेऊन अकोला येथे घेऊन गेले. या वेळी वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी संतोष काळे, डॉ एस चांद , उज्वल महाजन, अतुल मंगलकर, सुभाष वiडे, दशमुखे गुरूजी, मोहन सरप, संदीप राठोड, दिपक महाजन, कपाटे, इत्पादी नागरीक उपस्थित होते.