*स्थगिती नाही शासन निर्णय रद्द पाहिजे
* आमदारांना गाव बंदीचा इशारा
* वानच्या पाण्याबाबत शेतकऱ्यांनि पत्रकार परिषदेत केली भूमिका स्पस्ट
तेल्हारा दि – तेल्हारा तालुक्यातील वान धरणातील पाणी शासनाने जे अकोला करिता आरक्षित केले तो शासन निर्णय रद्द करण्यात यावा हि आमची मुख्य मागणी असल्याने आम्हाला त्यावर स्थगिती नाही पाहिजे स्थगितीच्या नावाखाली शेतकऱ्यांनच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या कडून होत आहे तसेच मंगळवारी मुंडगावला असतांना मुख्यमंत्र्यांची भेट झाली तरी कशी असा आमचा प्रश्न असून आमदार शेतकऱ्यांना मुर्खच नव्हे तर महामुर्ख बनवत आहेत त्यामुळे मागणी मंजूर ना झाल्यास वेळप्रसंगी आमदारांना गावबंदी करण्याचा इशारा सुध्दा पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी दिला जो पर्यंत शासन निर्णय रद्द होत नाही तो पर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे व शनिवारचा बैलबंडी मोर्चा सुध्दा ठरल्याप्रमाणे निघणार आहे असे पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी सांगितले . तेल्हारा तालुक्यातील वान धरणाचे पाणी अकोला करिता आरक्षित केल्यामुळे तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांनचा सिचनाचा प्रश्न निर्माण झाला शासनाने अकोला करिता पाणी आरक्षित करण्याबाबत जो निर्णय घेतला तो रद्द व्हावा ही शेतकऱ्यांनची प्रमुख मागणी आहे .आमदार प्रकाश भारसाकळे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व शेतकऱ्यांनच्या रोषा बाबत त्यांना अवगत केले असे आमदार यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून सांगितले परंतु आमदार भारसाकळे मंगळवारला मुंडगावला असतांना मुख्यमंत्र्यांची भेट झाली तरी कशी असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी विचारला हा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांनच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे .वेळप्रसंगी सदर शासन निर्णय रद्द न झाल्यास आम्हाला आ.प्रकाश भारसाकळे यांना गावबंदी करावी लागेल असा इशारा सुध्दा पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी दिला तरी त्यांनी मुख्यमंत्री यांना भेटून सदर शासन निर्णय रद्द करावा ही आमची मागणी आहे तसेच नियोजित शनिवार दि १४सप्टेंबरला सकाळी १० वाजता आडवडी बाजार तेल्हारा येथून बैलबंडी मोर्चा तहसील कार्यालयावर निघणार आहे या मध्ये हजारो शेतकरी बांधव सहभागी होणार आहेत काही जण आंदोलन दळपण्याचा प्रयत्न करणार आहेत त्याला शेतकरी बांधवानी बळी पडू नये असे विश्रामगृह तेल्हारा येथे आयोजित बैठकीत शेतकऱ्यांनि सांगितले या वेळी पत्रकार परिषदेला अतुल ढोले प्रदीप कळू,दिलशाद शाह चांद शाह , उत्तम नळकांडे,श्रीराम ठाकरे,श्रीकृष्ण ठाकरे,विजय बोर्डे,हरिदास वाघ,रामा पाटील कडू,संतोष मामनकर ,योगेश वीचे,प्रशांत वडतकार इत्यादी शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते