अकोट (देवानंद खिरकर ): एका महिलेची तब्येत सिरियस असल्यामूळे तिला चालता बसता सुध्धा येत नव्हते.त्या महिल्र सोबत तिची महिला नतेवाईक सोबत होती. परंतू एकट्या महिलेला पेशंटला उचलून नेणे शक्य नव्हते कशी तरी ती बसत बसत चिठ्ठी फाडल्या नंतर डॉक्टर परंत पोहचली डॉक्टरांनी चेकअप केल्या नंतर ईजेक्शन देण्याचे सांगितले. महिला चालणे शक्य नसल्यामूळे त्या महिला पेशंटने येथेच ईजेक्शन देण्याची विनंती केली.
परंतू कर्तव्यावर असलेले नर्सने स्पष्ट नकार दिला. ईजेक्शन वार्ड मधे या तिथेच ईजेक्शन देण्यात येईल अशी बोलली. अखेर ईजेक्शन वार्डच्या दरवाज्या समोर महिला पेशंटने जमिनिवर झोपली. परंतू तिथे सुध्धा येवुन ईजेक्शन देण्यास नर्सने नकार दिला. अखेर तिथे असलेल्या नागरिकांनी मदत केली. ईजेक्शन व वार्ड मधे नेण्यात आले. एका महिला पेशंट सोबतची ही वागणूक आहे. अकोट ग्रामीन रुग्णालयात नविन नसुन अशा घटना दररोज घडतात. याबद्द्ल अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री.रणजित दादा पाटिल यांनी काही दिवसापुर्वी अकोट ग्रामीन रुग्णालयाचा भोंगळ कारभाराची पाहणी केली होती. पुर्ण स्टापला धारेवर धरले होते. पन याचा काहिच फायदा झाल्याचे दिसून येते नाही. शेवटी एकच आहे सरकारने कितिही सुविधा उपलब्ध केल्या असल्या तरी चांगले कर्मचारी अकोट येथे नसल्यामूळे अकोट ग्रामीण रुग्णालयात गोर गरिब जनतेचे असे हाल दररोज होत आहेत. शेवटी एकच गरिबाचा वाली कोणीच नाही देवा शिवाय.