अकोला (प्रतिनिधी)- भारतीय मौसम विभाग ,नागपुर यांच्या संदेशानुसार दि. 13 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2019 दरम्यान विदर्भातील सर्व जिल्ह्यात पाऊस, वीज पडणे, अतिवृष्टी होणे अशी शक्यता वर्तविली आहे. तसेच 29 जुलै 2019 पासुन पुर्णा नदीच्या पातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. इतरही नदी नाल्यांना पुर आलेला आहे. पोपटखेड, वान प्रकल्पातुन तसेच अमरावती जिल्हयातील पुर्णा, चंद्रभागा, शाहानुर या प्रकल्पातुन कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो.
नदी, नाला काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. तसेच क्षेत्रीय यंत्रणांनी मुख्यालयी उपस्थित राहण्याबाबत सुचित करण्यात येते असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कळविले आहे.