अकोला(प्रतिनिधी)- अकोल्यातील खोलेश्वर व नेकलेस रोड रतनलाल प्लॉट परिसरात अकोला पोलिसांच्या विशेष पथकानं कारवाई करत, अवैधरित्या विक्री सुरु असलेला स्टेरॉयड इंजेक्शनचा साठा मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आला. या मुद्देमालाची सुमारे सत्तर ते अंशी हजार अशी किंमत आहे. खेळांडूचा शाररिक क्षमता वाढण्यासाठी या स्टेरॉयड इंजेक्शनचा वापर केला जात होता. या दरम्यान, सचिन ओमप्रकाश शर्मा, विनायक मनोज मुळे, स्वप्निल कैलास गाडेकर या तिघांना रंगेहात घटनास्थळवरुन रंगेहात अटक करण्यात आली. या प्रकरणी औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम अन्वयेनुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. ही कारवाई ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल गांवकर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकार आणि अन्न व औषधी विभागाचे निरीक्षक हेमंत मेतकर यांनी सयुक्तरित्या केली आहे.
स्टेरॉयड इंजेक्शनचे दुष्परिणाम
मुरूम येणे, झोप न येणे, उलटी, डायरिया, रक्तामधील कॅलसिम वाढणे, महिलांमध्ये पौरुषत्व गुण वाढणे, डोकं दुखी होणे,हार्मोनल असंतुलन होणे,पौरुषत्व शक्तीचा नाश होणे यासह आदिं प्रकारचे दुष्परिणाम होय.
अधिक वाचा : “विज्ञान मेळावा बालवैज्ञानिक घडवणारा महोत्सव”-गटशिक्षणाधिकारी आकाळ यांचे प्रतिपादन
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola