अकोट(देवानंद खिरकर)- आपल्या सामाजीक कार्यातून समाज आनी लोकप्रतिनिधि समोर आरसा ठेवणारे आपल्या कार्याने अल्पावधितच सामान्य लोकांच्या काळजा पर्यंत पोहचलेल्या लोकजागरमंच या सामाजिक चळवळीच्या आसेगाव बाजार सर्कल प्रमुखपदी मा.श्री.अतुल विनायकराव चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.स्थानिक संपर्क कार्यालयात एका छोटेखानि कार्यक्रमात त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष गजानन बोरोकार,तालुका उपाध्यक्ष योगेश जायले,संघटक अर्जुन गाळखे,प्रकाश गायकी,अक्षय गावंडे,शहर अध्यक्ष सुरज शेंडोकार ,रितेश चौधरी बबलू वालसींगे,अनिकेत चौधरी,व ईतर सदस्य उपस्थित होते.