अकोला : शहरातील तोष्णीवाल लेआऊटमध्ये हाँरीझन कोचिंग क्लासेस हा एक खासगी क्लास आहे. मंगळवारी येथे शिकवणीसाठी आलेल्या एका विद्यार्थिनीने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. त्यात ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र तीच्या या कृत्यापाठीमागचे कारण अजूनही अस्पष्ट आहे.
अकरावीचे शिक्षण घेत असलेली ही युवती नेहमीप्रमाणे मंगळवारी हाँरीझन कोचिंग क्लासेसमध्ये आली होती. त्यानंतर काही वेळाने ती शिकवणी वर्ग असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडलेली दिसून आली. स्थानिक नागरिकांना ही घटना निदर्शनास येताच त्यांनी जखमी मुलीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. जखमी विद्यार्थिनी ही शहरातीलच कृषी नगर भागातील रहिवासी आहे.
दरम्यान, विद्यार्थिनीचे आत्महत्येचा प्रयत्न केला, की तिला आत्महत्येला प्रवृत्त केले याचा पोलीस तपास करत आहेत.या युवताची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, या घटनेनंतर युवतीच्या वडिलांनी सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात कोचिंग क्लासच्या विरोधात तक्रार देण्यास गेले होते. पोलिसांनी मात्र युवतीच्या जबाबानंतर योग्य ती कारवाई करू, असा विश्वास त्यांना दिला आहे.
अधिक वाचा : अ.भा. ग्रा. पत्रकार संघाची बैठक संपन्न, सामाजिक कार्यात पुढाकार घेण्याचा निर्धार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola