तेल्हारा(प्रतिनिधी) : एस.टी. चा प्रवास म्हणजे सुखाचा प्रवास असे ब्रीद वाक्य घेऊन एस टी प्रशासन आपला कारभार चालवत आहे. मात्र एस टी चा प्रवास दुःखाचा प्रवास असे वाक्य तेल्हारा बसस्थानकातील बस ने प्रवास करणारे प्रवाशी बोलून दाखवत आहेत.
सविस्तर वृत्त असे आहे की, आज सकाळी तेल्हारा डेपोची एम एच ४० एन ८२८४ क्रमांकाची बस आज अकोल्यावरून तेल्हारा कडे निघाली असता या बसमध्ये विद्यार्थ्यांसह इतर प्रवाशी बस मध्ये प्रवास करीत असताना पाऊस सुरू होता. मात्र बसमध्ये बसल्यानंतर पावसापासून सुटका मिळणार, असे प्रवाशांना वाटले. मात्र तिथे झाले उलटेच जे प्रवाशी रेनकोट घालून बसले होते त्यांना रेनकोट काढायची गरज पडली नाही, तर जे प्रवाशी छत्री घेऊन आले होते ते छत्री उघडून बस मध्ये प्रवास करू लागले. त्याला कारणही तसेच होते बसची खस्ता हालत असल्याने संपूर्ण बस ही गळणे सुरू होऊन, पाण्याच्या धारा लागल्या होत्या. प्रवाशी मात्र आपला पावसाच्या पाण्यापासून बचाव करीत असल्याचे चित्र सदर बस मध्ये दिसून आले. त्यामुळे तेल्हारा बसस्थानकातील बस ने प्रवास करीत आहात, मग रेनकोट छत्री घेऊन जा, असे प्रवाशांना सांगण्याची वेळ आली आहे.
तेल्हारा डेपोचा कारभार बघता नेहमीच चर्चेत राहणारे डेपो असून बसची खस्ता हालत प्रवाशांचा जीवावर उठली आहे. अशा बसेस ची दुरुस्ती करून, वरिष्ठांनी या बाबी ची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी प्रवाशी करीत आहेत.
अधिक वाचा : उद्या अखिल भारतिय ग्रामीण पत्रकार संघाची जिल्हास्तरीय बैठक अकोल्यात
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola
Comments 3