अकोट (देवानंद खिरकर) : शेकडो केसरी कार्डधारक मिळण्यापासून वंचित असल्याने शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांनी सहकुटुंब आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिल्यानंतर पुरवठा विभाग सतर्क झाला. अकोट तहसील कार्यालय मध्ये 18 जुलै रोजी आमदारगोपीकीशन बाजोरीया व जिल्हा पुरवठा अधिकारी बबनराव काळे यांनी बैठक घेऊन 15 ऑगस्ट पूर्वी सर्व केसरी कार्डधारकांना प्राधान्य गटाचा लाभ देणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे लवकरच प्राधान्य गटातील धान्य मिळणार असे दिलासा कार्डधारकांना मिळाला आहे.
केसरी कार्डधारकांना धान्यपुरवठा बंद आहे. त्यामुळे हजारो केसरी कार्ड धारक भंटकण्याची वेळ आली. शिधापत्रिकाधारकांना दुकानदार मशीनचे माध्यमातून थंबच्या नावावर त्रास देत असल्याच्या तक्रारी आहेत. दुसरीकडे प्राधान्य गटातील पाच हजार केशरी कार्डधारक वंचित आहेत. शिधापत्रिकेचे धान्य प्रकीयाकरीता येणाऱ्या नागरिकांना तहसिल पुरवठा विभागात हेलपाटे घ्यावे लागत आहे.
सर्वसामान्य नागरिकांची मूलभूत गरज असलेल्या या विभागाकडे लोकप्रतिनिधीचे मात्र दुर्लक्ष होत असल्याने कुटुंबासह तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे व जिल्हा दक्षता समितीच्या सदस्य नगरसेविका विजया बोचे यांनी दिला होता. दरम्यान 18 जुलै रोजी तातडीने कार्यालयात आमदार गोपीकीशन बाजोरिया हे जिल्हा पुरवठा अधिकारी बबनराव काळे यांच्यासह दाखल झाले.
याठिकाणी उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या वंचित केशरी कार्डधारक यांच्यासह बैठक घेण्यात आली. यावेळी अकोट तहसीलदार अशोक गीते, पुरवठा अधिकारी चव्हाण यांनी आपल्या समस्या मांडल्या परंतु उपजिल्हाप्रमुख बोचे यांनी कोणत्याही स्थितीत प्राधान्य गटातील धान्य केसरी काढताना लवकर देण्यात यावे, त्यांना कार्ड देण्यात यावे, पात्र असलेल्या केसरी कार्डधारकांना धान्य देण्याकरता स्वस्त धान्य दुकानदारांना आदेश देण्यात यावे, अशी मागणी लावून धरली.
यावेळी झालेल्या बैठकीनंतर शेकडोंच्या संख्येने जमा झालेल्या केसरी कार्ड का समोर बोचे यांनी आमरण उपोषण मागे घ्यावे 15 ऑगस्ट पर्यंत सर्व केसरीकार्डधारकांना प्राथमिक गटातील शिधापत्रिका देण्यात येणार तसेच त्यांच्या हक्काची त्यांना धान्य देण्यात येणार आहे. मशीन वर न येणारी थांब तसेच इतर समस्या सुद्धा दूर करण्यात येते असे आश्वासन जिल्हा पुरवठा अधिकारी बबनराव काळे यांनी दिले.
याप्रसंगीदिलीप बाेचे ( शिवसेना उपजिल्हाप्रमुख),साै विजया बाेचे (जिल्हा दक्षता समिती सदस्या), श्याम गावंडे (ता. प्रमुख), विजय माेहाेड तेल्हारा ता.प्र मुख, मायाताई म्हैसनै जिल्हा संघटक महीला आघाडी, साै जयश्री बाेराेडे, विक्रम जायले जिल्हा उपसंघटक,प्र शांत अढाऊ जि.प .सदस्य, राेषन पर्वतकर, संजय गयधर, गाेपाल म्हैसने, राहुल पाचडे, विजय भारसाकळे, उषाताई गिरनाळे,शिल्पाताई ढाेले, नगरसेवक आखिल पटेल, संताेष जगताप, संजय भट्टी, विजय ढेपे, अजय गावंडे, प्रविण वैष्णव, गाेपाल कावरे, प्रशांत येऊल, देवानंद खिरकर, निलेश गाैड, उमेश आवारे, नंदु कुलट, सुरेश अंभाेरे, सुरेश शेंडाेकार, साेपान साबळे, देवानंद बाेराेडे, सुरेश नारे, गणेश शेलकर, सतिश कळसकर, प्रफुल बाेरकुटे, पिंटु वानखडे, विशाल नाथे, याेगेश वर्मा, प्रविण शेंडाेकार, द्यानेश्वर बाेराेकार, संजय अढाऊ, हितेश चावडा, महेंद्र अंबळकार यांच्यासह शेकडो कार्डधारक उपस्थित होते.
चौकट…
अतिरिक्ततकम्प्युटर देणार केशरी कार्डधारकांना लवकरात लवकर प्राधान्य गटातील धान्य मिळावे त्यांची नव्याने शिधापत्रिका तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण व्हावे याकरता महसूल विभागात असलेल्या संगणका व्यतिरिक्त आपणाकडून दहा संगणक उपलब्ध करून देणार असल्याचे आमदार गोपीकिसन बाजोरिया यांनी जाहीर केले तसेच केसरी धारकांच्या कोणत्याही समस्या असतील तर त्यांनी आमचे उपजिल्हाप्रमुख दिलीप यांच्याशी संपर्क करावा त्यांना शासनाच्या योजनेचा पूर्णपणे लाभ देण्यात येईल आम्ही सत्तेत असलो तरी मात्र त्यांचे सोबत राहून त्यांचे काम करण्याला आमचे प्राधान्य राहणार असल्याचे आमदार बाजोरिया यांनी सांगितले.
चौकट …
तहसील कार्यालयावर शिवसेनेचे शिबिर
अकोट तहसील कार्यालय मधील पुरवठा विभाग केसरी कार्डधारकांचे प्राधान्य गटातील धान्य मिळण्याकरीता नवीन शिधापत्रिका बनवणार आहेत. परंतु त्यांच्या कामाला सहकार्य व गती देण्याकरीता तसेच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येकाला धान्य मिळावे याकरीता शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालय परिसरात विशेष शिबिर 22 जुलैपासून सुरू करण्यात येणार असल्याचे उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांनी जाहीर केले.
अधिक वाचा : वंचीत आघाडी मध्ये इच्छुकांची भाऊ गर्दी, १२३ उमेदवारांनी दिल्या मुलाखती
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola