अकोला (प्रतिनिधी) : दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा विठ्ठल रुक्मिणी मंदीरे समिती पंढरपूर यांच्या आदेशावरुन दि. 9 जुलै ते 15 जुलै पर्यंत संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जिवरक्षक दीपक सदाफळे यांच्या नेतृत्वात स्वयंसेवक प्रविण जवके, महेश साबळे, अतुल उमाळे, ऋषीकेश तायडे, अंकुश सदाफळे, आकाश राऊत, ज्ञानेश्वर वेरुळकार, धिरज राऊत, गोकुळ तायडे, आशिष ऊगले, ऋषीकेश राखोंडे, निखील ठाकरे, राहुल जवके, अंकुश चांभारे, ऋषीकेश अंधारे, योगेश चव्हाण, चेतन इंगळे, संतोष मांडवगडे, गोपाल जैयस्वाल, गोपाल गीरे, भास्कर राऊत, ऋतीक सदाफळे, दीपक सीरसाट, चंदु कुळकण, यासह एक आपात्कालीन वाहन आणी वाॅटर रेस्क्यु कीट प्रथमोपचार कीट एक रुग्णवाहिका सह वाळवंट परीसर ते चंद्रभागा नदीपात्रात आंम्ही वारक-यांच्या रक्षणासाठी 24 तास सज्ज होतो.
आपत्ती आणी सुरक्षा व्यवस्थापन अतिशय चोखपणे गेल्या सहा दीवसात आंम्ही पार पाडले. या कालावधीत सेवा देत असतांना चंद्रभागेच्या नदीपात्रात वारकरी भक्तांना पाण्यात बुडत असतांना वाचविण्यात आंम्हाला भरीव यश आले. यामध्ये भरत सुरेश खंदारे वय अं. 32 रा. कानडी ता. तळणी जिल्हा जालना या वारक-यास गुजर घाटा समोरु बुडत असतांना वाचविले. निलेश अर्जुन रास्कर वय अं. 25, भाऊसाहेब रमाजी चव्हाण वय अं. 38, विकास भास्कर बोरोडे वय अं. 35 तीघेही रा. शिरुर जिल्हा पुणे हे तीघेही वारकरी पुंडलिक महाराज मंदीराजवळुन ईस्काॅन घाटाकडे चंद्रभागा नदीपात्रातुन पोहत जात असतांना तीघांचाही दम सरला आणी बुडायला लागले.
येढ्यातच गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे जवान रेस्क्यु बोट ने पेट्रोलींग करीत असतांना हे बुडत असतांना निदर्शनास आले आणी तात्काळ बुडण्याच्या अवस्थेत असलेल्या तिघांना जवळ जाऊन आंम्ही तीनही वारकरींना वाचविले. याच प्रमाणे आणखीन तीन जणांना वाचविण्यास आंम्हाला भरीव यश आले. एकुण सहा दीवसात आंम्ही नऊ भक्तांना अगदी मृत्यूच्या दाढेतुन खेचुन आणले. तसेच दोन मृतदेह सर्च ऑपरेशन राबवुन शोधले आणी पोलीसांच्या ताब्यात दीले.
तीसरी घटना दी. 10 जुलै रोजी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान बांगड धर्मशाळा कवठेकर गल्ली महाद्वार येथे तीस-या माळयावर एका रुममधे घोटी ता. इगतपुरी जिल्हा नाशिक येथील वारकरी मुक्कामाला थांबले असता कीचन रूममध्ये अचानक गॅस सिलिंडर ने पेट घेतला आणी आग लागली तेव्हा धर्मशाळेचे मालक राजेंद्र व्यास यांनी धाडस करुन सिलिंडर विझवण्याचा यशस्वीपणे प्रयत्न केला परंतु रूममध्ये आग लागल्याने संपुर्ण साहीत्य वैगरे जळाले. एवढयातच जिवरक्षक, दिपक सदाफळे आणी तेथीलच जगन्नाथ करकमकर,मंगेश आंबेकर अग्नीशमन विभागाचे दोन फायरमन यांनी आग विझवुन जळालेले गॅस कनेक्शन खाली आणले सर्व वीजपुरवठा खंडित केला. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.
यासह वाळवंटात सहा दिवसाच्या आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षा सेवेत जवळपास विविध घटनांमध्ये जसे की. अपघात, चक्कर, बेशुद्ध अवस्थेत वारकरी, पायघसरुन पडलेले वारकरी अशा शंभरच्यावर वारक-यांना मदत व सेवा देऊन सुरक्षितस्थळी आनुन दीले. या सर्व सेवा आमच्या हातुन झाल्याचा मानसिक समाधान आणी आनंद वाटत असल्याची माहिती पथक प्रमुख दिपक सदाफळे यांनी दीली. 15 जुलै रोजी सायंकाळी विठ्ठल रुक्मिणी मंदीरे समितीच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मंदीरात आमचा सत्कार समारंभ करुन आंम्हाला भव्यदीव्य असा निरोप देण्यात आला.
तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विशाल बढे साहेब तथा SDRF फोर्स तथा आपत्ती व्यवस्थापन फोर्स खडकी पुणे यांचे सहकार्य लाभले. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने आम्हांला ही आपत्ती व सुरक्षा व्यवस्थापणाचा मान मिळाल्याने विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे तथा मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब पंढरपूर यांचे आंम्ही सदैव आभारी आहोत.
अधिक वाचा : अकोल्यात डॅशिंग एस पी येत असल्याने जिल्ह्यातील पोलीस स्टेशन अलर्टवर, अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घेतली धास्ती
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola