तेल्हारा (प्रतिनिधी) : तालुक्यातील गाडेगाव ग्राम पंचायत प्रशासनाचा कारभार हा निगरगट्ट झाला असून नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असताना तक्रार करून सुद्धा साधी दखल घेण्याची गरज राहलेली नसल्याने नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तालुक्यातील ग्राम पंचायत गाडेगाव ही महत्वाची तसेच राजकीय दृष्ट्या महत्वाची समजल्या जाते मात्र या ग्राम पंचायत चा कारभार हा निवडणुकी नंतर काही दिवसात बिघडल्याने गाडेगाव वासीयांना प्रशासनाच्या कारभाराचा फटका बसत असून सुख सुविधा देण्यास असमर्थ ठरत आहे. ग्राम पंचायत सरपंचांसह सदस्य हे आपल्या राजकारण करण्यात धन्यता मानत असून नागरिकांच्या समस्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. त्यामुळे येथील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे गाडेगाववासी बोलून दाखवत आहेत.
ग्राम पंचायत वॉर्ड क्रमांक २ मध्ये राहणारे नितीन वाकोडे यांच्या घरातील व इतर नागरिकांच्या नळामधून शौचालयाचे दूषित पाणी येत असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असतांना वाकोडे यांनी याबाबत ग्राम पंचायत प्रशासनाला तक्रार केली मात्र प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतल्या गेली नसल्याचे वाकोडे यांचे म्हणणे आहे.ग्राम पंचायत प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याशी होणारा खेळ थांबवावा अशी मागणी गावकरी करीत आहेत.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola