अकोट (देवानंद खिरकर) : शेतकरी बांधवांना सोयाबीन चे बोगस बियाणे वितरण करणाऱ्या अंकुर अग्रेसर कंपनी चे विभागीय व्यवस्थापक मा. भुसारी साहेब यांनी शिवसेना गटनेता मनिष रामाभाऊ कराळे व शेतकऱ्यांच्या समक्ष मागितली भरपाई देण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली आहे. अकोट तालुक्यातील वाई, चंडिकापुर, वडगाव मेंढे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी अंकुर अग्रेसर कंपनी चे बियाणे सोयाबीन चा जवळपास १०० एकरांवर अधिक पेरा केला होता. परंतु अक्षरश: हे सोयाबीन निघालेत नाही. संपुर्ण १०० एकरांवर अधिक शेतकरी बांधवांचे शेत उलटले असुन त्यामुळे शेतकऱ्यांचे हजारों रूपये बुडाले आहेत.
अंकुर कंपनी जर अश्या बोगस बियाणे वितरण करत असेल तर कंपनी वर व वितरकांवर गुन्हे दाखल करू अश्या आशयेचे बोलणी शिवसेना गटनेता मनिष रामाभाऊ कराळे यांनी शेतकऱ्यांच्या समक्ष अंकुर कंपनीचे विभागीय व्यवस्थापक या. भुसारी साहेब यांच्याशी चर्चा केली व भरपाई देण्याची मागणी केली व व्यवस्थापकांनी दोन दिवसांची मुदत मागितली तर दोन दिवसांत भरपाई न दिल्यास १८-०७-२०१९ शुक्रवार ला ठिक १२.वा शिवसेना_युवासेना_महिला आघाडी तर्फे उपविभागीय अधिकारी व तालुका कॄषी अधिकारी यांना रितसर निवदेन देवून तिव्र आंदोलन छेडण्यात येईल तरी सर्व शेतकरी बांधवांनी मनिष कराळे यांचे जनसंपर्क कार्यालय येथे उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना गटनेता मनिष रामाभाऊ कराळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक वाचा : अकोल्यात डॅशिंग एस पी येत असल्याने जिल्ह्यातील पोलीस स्टेशन अलर्टवर, अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घेतली धास्ती
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola