अकोला : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पामध्ये सध्या 4.22 दलघमी पाणी आहे. हे पाणी दीड महिना पुरणार असल्याचे वृत्त नऊ जुलै रोजी प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी जलप्रदाय विभागाकडून प्रकल्पातील पाण्या संदर्भात बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी आज एक प्रसिद्धीपत्रक काढत पाणी काटकसरीने वापरण्याचे, आवाहन अकोलेकरांना केले आहे.
काटेपूर्णा प्रकल्प मागील वर्षी 96 टक्के भरले होते. या प्रकल्पातील पाणी मुर्तीजापूर शहर आणि खांबोरा पाणीपुरवठा योजनेसाठी वितरित करण्यात येते. त्यासोबतच या प्रकल्पातील पाणी शेतकऱ्यांना सोडण्यात आले. तसेच या प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाला. हा साठा एवढा कमी झाला की तो सध्या 4. 22 दलघमी आहे.
विशेष म्हणजे, पावसाळा सुरू होऊन एक महिना झाला असला तरीही या प्रकल्पात पावसाचे एक थेंबही पाणी साचलेले नाही. त्यामुळे या प्रकल्पाची पाण्याची पातळी सतत खाली जात असल्यामुळे या प्रकल्पातील पाणी दीड महिना पुरेल असे प्रकल्पाचे अभियंता यांनी सांगितले होते. त्यानंतर मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी महापालिका जलप्रदाय विभागाची बैठक घेऊन प्रकल्पातील पाणीसाठ्याची माहिती घेत पाण्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले. तसेच त्यांनी या संदर्भात एक प्रसिद्धीपत्रक काढून अकोलेकरांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन केले.
अधिक वाचा : अकोला : पोपटखेड लगतच्या जंगलात सांबराची मुंडक्यासह शिंग पोलिसांनी केले जप्त
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola