जळगाव (सुनिलकुमार धुरडे) : तालुक्यातील सुनगाव जवळचे सातपुडा पर्वतातील उंबरदेव ते कुवरदेव हा सम्पन्न वनांचा भाग, धोक्यात आले असून येथील होणारी वृक्षतोड,अवैध चराई,लगेच थांबवण्यात यावी असा इशारा वन परिक्षेत्र अधिकारी जळगाव जामोद याना एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या संदर्भात दि 30 एप्रिल रोजी ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर असून या ठरावाला सुद्धा वनविभाग जुमानत नसून दि 2 मे 2019 ला दिलेल्या निवेदनावर आतापर्यंत कुठलीच कारवाई वनविभागांने केली नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
हा सातपुडा वाचवण्यासाठीचा संघर्ष मागील 3 वर्षांपासून गावातील सातपुडा बचाव समिती, पाणी फाउंडेशन जलयोध्ये,व ग्रामपंचायतसह असंख्य महिला पुरुष वृक्षप्रेमी करत असून वनविभाग मात्र कुठलाच प्रतिसाद न देता एकप्रकारे वणगुन्हेगारांची पाठीराखन करत आहे, वनविभागावर ग्रामवासीयांची नाराजी असून त्वरित कडक कारवाई न केल्यास लवकरच सातपुड्याला उंबरदेव ते कुवरदेव अशी 30 किमी ची मानवी साखळी आंदोलन जिल्ह्यातल्या वनप्रेमींना एकत्र करून केल्या जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
एकीकडे 33 कोटी वृक्षलागवड करत असताना जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्यात मात्र जुने सागवान, अंजन इत्यादी बहुगुणी वृक्ष नष्ट होत आहेत. सातपुड्यात जागोजागी अवैध चराई सुरु असून येथील जुना पाणी भागात परप्रांतीय मेंढपाळ हजारो मेंढ्या घेऊन घुसल्याची माहिती आहे, ह्या मेंढपाळ यांचा सुद्धा बंदोबस्त करण्यात येऊन 100% कुऱ्हाड बंदी व्हावी हि प्रमुख मागणी आहे.
मागील 2 वर्षांपासून गावाने पाणी फौंडेशन च्या वाटर कप स्पर्धेत भाग घेऊन जलसंधारण चे कामे 48 डिग्री तापमानात श्रमदान करून केली ,त्या कामानासुद्धा धोका तयार झाला आहे, वन विभागाने त्वरित दखल घेत सातपुडा वाचवला नाही तर अमरावती विभागीय वन कार्यालयावर गावातून मोर्चा जाईल असे म्हटले आहे.
“आम्ही आतापर्यंत 2 निवेदने दिली असून वनविभाग ग्रा प ठरावाला केराची टोपली दाखवत कारवाईस टाळाटाळ करत आहे” – प्रवीण धर्मे ग्रा प सदस्य
“आम्ही अतिशय मेहनतीने श्रमदान करून पाणी फोउंडेशन ची कामे केली ती मेंढ्यांच्य पायाने तुडवली जात आहेत” – मोहनसिह ठाकूर कृषिमित्र व वनप्रेमी
“गावकरी च्या सहकार्याने लवकरच योग्य ती कारवाई करू’ खान साहेब प्र.वन परी.अधिकारी वनविभाग
निवेदनावर पुंडलिक पाटील माजी सरपंच, प्रवीण धर्मे ग्रा प सदस्य, मोहनसिंह राजपूत वनप्रेमी, गणेश अंबडकार ग्रा प सदस्य , अनिल भगत, सौ विजयाताई पुंडलिक पाटील सरपंच यासह इतर शेकडो सह्या आहेत.
अधिक वाचा : सातपुड्याच्या पायथ्याशी शिकारीच्या फास्यात अडकून बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू, वनविभागाची लेटलतीफ
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola