अकोट (देवानंद खिरकर) : तालुक्यातिल शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पणज व आलेवाडी या गावाजवळील पुल वाहून गेले आहेत. अकोट तालुक्यात व सातपुड्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली त्यामूळे नदी नाल्यांना मोठा पुर आला आहे. अकोट शेगाव मार्गवरिल देवरी फाटा नजिक असलेल्या अलवाडी गावा जवळ नदीला पुर आल्या मुळे पुल वाहुन गेला आहे. सोबतच पुलवरील मोठे पाइप सुधा वाहून गेले आहेत.
तसेच पणज गावाजवळील बोर्डी नदीवरील पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. नदीवरील बांधलेला कच्चा पुल वाहुन गेल्यामुळे एक कूपनलिकेचा ट्रक नदीत पलटी होऊन पडला आहे. विशेस म्हणजे अकोट तालुक्यात अंजनगाव शेगाव अकोला या मार्गचे काम सुरु आहेत. यामुळे या रस्त्यावर चिखल साचला आहे .तसेच ठिक ठिकानी पुलाचे काम सुरु असल्यामूळे कच्चे पुल वाहुन जात आहेत. पुल व रस्ता बांधकामाला गती दीली नाही. त्यामुळे या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वारंवार रोड बंद पडत आहेत.व रोडवर चिखल होऊन वाहतुक ठप्प होत आहे.
अधिक वाचा : अकोला : घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी घट
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola