मुंबई : इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात 25 जून 1975 मध्ये लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला देशाच्या लोकशाही इतिहासात एक काळे पर्व मानले जाते. या घटनेला आज 44 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगाव्या लागणाऱ्यांना सरकारकडून पेन्शन आणि प्रशस्ती पत्रक देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
विधानसभेत बोलताना मंगळवारी मुख्यमंत्री म्हणाले की, आणीबाणीच्या काळात जे लोक तुरुंगात गेले होते त्यांना पेन्शन आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येईल. अनेकांनी तेव्हा ही पेन्शन नाकारली. मात्र तेव्हा नोकऱ्या गमावणारे अनेकजण आता गरिबीत जगत आहेत. त्यांच्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
तत्पूर्वी, राज्याचे मदत आणि पुनर्वसन राज्य मंत्री मदन येरावर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या प्रश्नावर उत्तर देताना आतापर्यंत 3 हजार 267 जणांचे अर्ज मंजूर करण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे ज्यांना आणीबाणीच्या काळात एक महिन्याचा तुरुंगवास भोगावा लागला त्यांना मासिक 5 हजार आणि एक महिन्यापेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिलेल्यांना 10 हजार पेन्शन देण्यात येणार आहे.
अधिक वाचा : आता मुंबईतला प्रवास होणार आणखी ‘बेस्ट’; किमान भाडे 5 रुपये
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola