तेल्हारा (प्रतिनिधी): महाविद्यालयात सुरू असलेल्या सत्र 2019-20 च्या प्रवेश प्रक्रियेत तेल्हारा शहर व तालुका मधील विध्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य देण्याबाबत व ऑनलाइन प्रवेश अर्जाची मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी आज 24 जूनला भाजयुमो च्या वतीने डॉ. गो. खे. महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या कडे करण्यात आली आहे. महाविद्यालयात सुरू असलेल्या सत्र 2019-20 मध्ये सर्व शाखांच्या 11 वि कला, वाणिज्य, एच.एस.व्ही.सी., बि.ए., बि.कॉम., बि.एस.सी प्रथम वर्ष च्या प्रवेश प्रक्रियेत तेल्हारा शहर व तालुक्यातील विध्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांचा प्रवेश निश्चित करावा. जेणेकरून तालुक्यातील एकही विध्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत कामा नये व त्याला इतर कुठे तालुक्याबाहेर प्रवेशासाठी भटकावे लागणार नाही. तसेच दि. 22 जून पर्यंतच ऑनलाइन प्रवेश अर्ज स्वीकारल्या असल्या कारणाने बरेचसे विध्यार्थी अर्ज करू शकले नाही करिता आपण प्रवेश अर्ज मुदत वाढ देऊन विध्यार्थ्यांना सहकार्य करावे. मागील वर्षी पडलेल्या दुष्काळ परिस्थितीमुळे सर्वांची आर्थिक स्थिती कमकुवत असल्या कारणाने कोणालाही तालुक्या बाहेर जाऊन शिक्षण घेणे अवघड आहे.
अशा परिस्थितीत विध्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे म्हणून तालुक्यातील विध्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांचा प्रवेश निश्चित करावा.तसेच महाविद्यालयात प्रवेश घेण्याकरिता आलेल्या विध्यार्थ्यांकरीत आपण मदत कक्ष स्थापन करण्यात यावा जेणेकरून विध्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया सुलभ होईल. व त्यांच्या अडचणीचे निवारण होईल.वरील विषयांवर जाणीवपूर्वक लक्ष देऊन,तालुक्यातील विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य देऊन,प्रवेश अर्ज मुदतवाढ देऊन,मदत कक्ष स्थापन करून,सुलभ प्रवेश प्रक्रिया कराल तसे न केल्यास भाजयुमो च्या वतीने विद्यार्थ्यांच्या हितार्थ आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातुन देण्यात आला. भाजयुमो चे जिल्हा सरचिटणीस लखन राजनकर तालुका अध्यक्ष सतीश जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली भाजयुमो चे शहर अध्यक्ष आकाश फाटकर यांच्या नेतृत्वात देण्यात आले या वेळी भाजयुमो शहर अध्यक्ष आकाश फाटकर,भाजयुमो विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष अभय काळे,राहुल फाटे,गणेश इंगोले,राहुल झापर्डे,शामल पवार,प्रशांत देशमुख,छोटू पाटिल विखे,सागर नेरकर,निलेश खेट्टे,नितीन मानकर,श्याम खारोडे, अक्षय सुरे,विठ्ठल मामनकार,श्याम ओळबे,आनंद राहणे,गोपी आप्पा,संजय ठाकरे,अक्षय छांगानी,मनोज पाथ्रीकर, प्रतीक पाथ्रीकर, राजेश बोरकर ,मयूर जोशी, राजा कुरेशी,गणेश माटे,किशोर हागे,रोशन भांभूटकर,प्रतीक पखान व भाजयुमो तेल्हारा चे पदाधिकारी , कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा : बाळापूर येथील सेतू धारकाकडुन होत असलेली आर्थिक लूट व गैरसोय थांबवण्या करिता शिवसेनेचे निवेदन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola