बाळापूर(शाम बहुरूपे)– बाळापूर शहरातील सेतू धारकाकडून विध्यार्थी व पालकांची आर्थिक लूट करण्यात येत आहे. नुकताच १० वी व १२वी च्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला असून पुढील शैक्षणिक प्रवेश प्रकियेकरीत विद्यार्थ्यांना उत्पन्न, जातीचे, अधिवास, नॉन क्रीमिलेअर सारख्या प्रमाणपत्राची आवश्यकता भासते आणि ते सर्व सेतूच्या माध्यमातून ऑनलाईन काढावे लागते.
निकाल लागल्या पासून विद्यार्थ्यांची ओढ ही वरील प्रमाणपत्रा करिता सेतुकेंद्राकडे असल्यामुळे तेथे गर्दी होत आहे.. त्यामुळे आपल्याला दाखला केव्हा मिळेल अशी विचारणी केल्यानंतर किंवा साहेबांनी तृटीत काढले तर आणखी दिवस वाढतील याची धास्ती मनात घेत विद्यार्थी सेतू धारकांना प्रमाणपत्र लवकर मिळण्यासाठी विनंती करतात आधीच ठरवलेल्या शासनशुल्काच्या पावती न देता दुप्पट पैसे हे विद्यार्थ्यांकडून उकळत होते. पण लवकर मिळून देण्याचे आमिष दाखवून तिप्पट चौपट पैसे घेत आहेत येथे येणाऱ्या विद्यार्थी आणि विशेष विद्यार्थीनी आणि महिलांना पुरुषांसोबत धक्के खात उभे राहावे लागते आणि त्यातही जागा पुरेशी उपलब्ध नसल्यामुळे बाहेर उन्हात सेतू केंद्राबाहेर थांबावे लागते जे की धोकादायक आहे. आधीच हे शहर संवेदनशील म्हणून ओळखले जाते त्यामुळे अश्या प्रकारामुळे येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या होणाऱ्या आर्थिक पिवळणुकीतून व गैर सोईतून विद्यार्थ्यांना व पालकांना येत्या ८ दिवसात मुक्त करावे अन्यथा शिवसेनेच्या वतीने कोणतीही सूचना न देता विद्यार्थी व पालकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना बाळापूर शहराच्या वतीने देण्यात आला. यावेळी शिवसेना अकोला जिल्हाप्रमुख नितीन बाप्पू देशमुख ,माजी तालुकाप्रमुख उमेशआप्पा भुसारी,माजी नगरपरिषद उपाध्यक्ष करणसिंह ठाकूर ,शिवसेना शहरप्रमुख आंनद बनचरे,युवासेना शहरप्रमुख शाम बहुरूपे, गणेश भिसे ,योगेश ठाकूर,शुभम ठाकूर,ऋषीकेश वाघ, श्रवण ठाकूर, आदी शिवसैनिक उपस्थित होते.
अधिक वाचा : जिल्हाप्रमुख नितीनबाप्पू देशमुख यांच्या मार्गदर्शनात प्रभागनिहाय शाखाप्रमुख नेमणूक बैठक संपन्न
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola