अडगाव बु (दिपक रेळे) : निरोगी पिढी देशाचे भविष्य आहे. योगासन करून निरोगी आयुष्य जगता येते यासाठी आंतरराष्ट्रीय योग योगासने करून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी 21जून हा सर्वात मोठा दिवस असून योग क्रियाचे महत्व सुद्धा धकाधकीच्या मानवी आयुष्यात अत्यंत महत्वपूर्ण व मोठे आहे.
पाचव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी अडगाव बु येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी आणि उर्दू मुलांची आणि मुलींची शाळा, आदिवासी आश्रम शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र येथील शिक्षक, कर्मचारी यांना प्राणायाम, आसन, व्यायाम करून योग दिन साजरा करण्यात आला तसेच डोंगराळ भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आदिवासी विद्यार्थ्यासोबत तेथील शिक्षक यांनी योग साजरा केला.
योग दिनाला अडगाव बु कन्या शाळेत श्री नितीन राजनकर सर मुलांच्या शाळेचे प्रशांत साखरपोहे सर सुभाष ढोकणे सर मुख्याध्यापिका कराले मेडम आदिवासी शाळेचे किशोर निमकरडे सर आरोग्य विभागाचे Dr. चव्हाण Dr. मंगेश राहटे कर्मचारी नीलेश अढाऊ.रतन बैरीसाल सहभागी झाले होते.
अधिक वाचा : आरोग्य निरोगी राखण्यासाठी दैनंदिन दिनचर्येत योगाचा वापर आवश्यक : जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola