अडगांव बु (दिपक रेळे/ तेल्हारा) : माझं वावर माझी पावर हे शेतकरी तंत्रज्ञान स्वतंत्रता करिता शेतकरी संघटनेने आंदोलन छेडले आहे. दिवसेन दिवस शेती चे तुकडे करण होत आहे. दोन चार एकरात परिवाराचा उदरनिर्वाह कठीण झालेला आह. जोवर शेती तंत्रज्ञान ची जोड मिळणार नाही तोवर शेती करणे अश्यक्य झाले आहे. तंत्रज्ञान शेतकऱ्यांचे दार वाजवत असून शासन आम्ही ते न स्वीकारावे असा अट्टाहास करीत आहे. 2010 पासून शासनाने bt च्या चाचण्या बंद केलेल्या आहेत ती बंदी लवकर उठवून शेतकऱ्यांना जैव तंत्रज्ञान चे मार्ग शेतकऱ्यांना मिळावे याकरिता दि 16 जूनला निलेश नेमाडे राहणार आडगाव बु या शेतकऱ्याने या बंदीला वाचा फोडण्या करिता उघड HT BT मी माझ्या शेतात लावणार हे जाहीर केले होते. निलेश नेमाडे यांनी लागवड केली. या वेळी प्रसाकीय अधिकारी सुद्धा उपस्थित होते.
10 जून येथे शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते ललित पाटील बाहाळे यांनी सर्वप्रथम अकोली जहागीर येथे तंत्रज्ञान स्वतंत्र भंडारा घेऊन या आंदोलनांची सुरवात केली. याला गावागावात समर्थन मिळत असून या आंदोलनात शेतकरी स्वतःहून सहभाग नोंदवत आहे. यालाच समर्थन करीत पुन्हा एकदा 19 जून ला सकाळी 9 वाजता संजय शंकरराव ढोकणेराहणार अडगाव बु हे आपल्या शेतात जाहीर लागवड करणार आहेत. संजय शंकरराव ढोकणे हे मोठे जमीनदार असून, उच्चक उत्पादन घेण्यामध्ये प्रसिद्ध आहेत .वेळोवेळी शेतात नवनवीन प्रयोग करून उत्पादकता कशी वाढेल यावर त्यांचा भर असतो. संजय ढोकणे अडगाव बु मधील प्रतिष्ठित नागरिक आहेत. दिवसेंदिवस शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला शेतकरी प्रतिसाद देऊन सहभागी होत आहेत. निलेश नेमाडे यांच्या शेतातील शेतकरी संघटनेचे आंदोलन यशस्वी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद व उत्साह चे वातावरण बघण्यास मिळत आहे.
शेती वेवसायात बियाणांचे फार महत्व आहे. जागतिक पातळीवर शेतकऱ्यांना टिकायचे असल्यास व जगाच्या शेतकऱ्यांसोबत स्पर्धा करायची असल्यास शेतकऱ्यांना जगात मान्य असलेले जैव तंत्रज्ञान मिळणे आवश्यक आहे 2010 पासून तत्कालीन सरकारने चाचण्या बंद केल्याने शेतकरी या तंत्रज्ञान पासून वंचित राहिला आहे. म्हणून लवकर यावरील बंदी उठवून शेतकऱ्यांना हा मार्ग मोकळा करून द्यावा असं मत शेतकरी संघटना तालुका तेल्हारा प्रमुख लक्ष्मीकांत कौठकर यांनी व्यक्त केले. तसेच जर शासनाने विनाकारण शेतकऱ्यांवर दबाव टाकल्यास शेतकरी संघटना प्रत्येक htbt लावणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील .
अध्यक्ष :
शेतकरी संघटना तेल्हारा
अकोला जिल्हा अध्यक्ष शेतकरी संघटना (माहिती व तंत्रज्ञान आघाडी )
मोबाईल नंबर : 9623603799
lkauthakar@gmail. com
अधिक वाचा : ‘माझ वावर माझी पावर’ शेतकऱ्यांनी काय पेरावे हा शेतकऱ्याचा जन्मसिद्ध हक्कच
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola