बाळापूर(डॉ शेख चांद)– तालुक्यातील उरळ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने लोकवर्गणीतून उरळ पोलिस ठाण्याचे रुप बदलून टाकले आहे. हिम्मत दंदी असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांनी लोकवर्गणीतून पुढाकार घेत पोलिस स्टेशनच्या आवारात वृक्षलागवड केली आहे. नागरीकांमध्ये पोलीसां विषयी असलेली द्वेषाची भावना दुर करत सकारात्मक भावना निर्माण होण्यासाठी देखील ते पोलिस ठाण्यात विविध उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या या कार्याची पावती म्हणून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी हिम्मत दंदी यांचा सत्कार करून कौतूकाची थाप दिली आहे. एखाद्या पंचतारांकित हॉटेलला लाजवेल अशी उरळ पोलिस स्टेशनची रंगीबेरंगी इमारत रात्रीच्या वेळी उजळून निघते. त्याचबरोबर परीसरातील वृक्ष त्यांच्या कामाची साक्ष देते.
शेगाव – अकोला मार्गावर उरळ येथे पोलीस ठाणे आहे. ठाणेदार सतिश पाटील यांनी ठाण्याचा पदभार स्वीकारताच दैनंदिन कामकाजात सुसूत्रता व कारभारात पारदर्शकता आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी हिम्मत दंदी यांनी पुढाकार घेत पोलिस स्टेशनच्या आवारात वृक्षलागवड केली आहे. नागरीकांसाठी बेंच, भिंतीवर रंगरंगोटी, परीसरात सिसिटीव्ही, स्वतंत्र पोलीस दालन, कर्मचाऱ्यांसाठी कुलर व्यवस्था, इत्यादी बदल शासनाचा कोणत्याही निधी न घेता करण्यात आला आहे. पोलिस ठाण्याचे प्रवेशद्वार, ठाण्याचे नामफलक, परीसराची स्वच्छता, पाण्याची सोय, इत्यादी मुळे वातावरण चांगले झाले आहे. परीणामी पोलीस ठाण्यात येणारा तक्रारदारही मोहीत होऊन त्याचा चिडचिडेपणा कमी होत असून शिवाय पोलीसांवरचा ताण देखील कमी होण्यासाठी मदत होत आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola