मुंबईः मुंबईतील प्रभादेवी येथे असलेले प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्यावर काही वेळ खळबळ माजली. परंतु, पोलिसांनी याचा मागोवा घेतला असता एकतर्फी प्रेमातून हा खोडसाळपणा केल्याचे समोर आले आहे.
ठाण्यातील विवियाना मॉलच्या शौचालयात सिद्धिविनायक मंदिर उडवून देण्याचा संदेश लिहिण्यात आला होता. ‘गज्वा-ए-हिंद, दादर सिद्धिविनायक मंदिर बूम.. इसिस इज कमिंग, स्लीपर सेल इज अॅक्टिव्हेटेड’, असा संदेश आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या संदेशासह एका मुलीचा आणि मुलाचा मोबाइल क्रमांक लिहिला होता. या मोबाइल क्रमांकाचा शोध घेतल्यानंतर आपल्या आधीच्या प्रियकराचे हे कृत्य असू शकते, अशी शक्यता मुलीने वर्तवली.
यानंतर ठाणे पोलिसांनी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले. हा तरूण विक्रोळीचा असून, एकतर्फी प्रेमातून आपणच हा खोडसाळपणा केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला एका मुलीला त्रास द्यायचा होता म्हणून त्याने हा सगळा प्रकार केल्याचे समोर आले. या तरुणाने धमकीचा मेसेज लिहून त्याखाली मुलीचा मोबाईल नंबर लिहिल्याचे सांगितले. यासंदर्भात अधिक तपास सुरू आहे.
अधिक वाचा : कृषी आणि उद्योग क्षेत्रात राज्याची मोठी पिछेहाट; आर्थिक पाहणी अहवाल जाहीर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola