अकोट (देवानंद खिरकर) : अकोट शहरातील सोसायटी जीन समोरील खुल्या जागेवर अतिक्रमण करुन सुरु असलेला वेश्या व्यवसाय बंद करण्यासाठी प्रभाग 7 मधिल नागरिक,महिला एकत्र आल्या त्यांनी नगरसेवक मनिष कराळे यांच्या नेतृत्वात अकोट शहर पोलिस कडे तक्रार केली.अकोट शहर पोलिसांनी तक्रार दाखल घेत त्या परिसरातील सुरु असलेला वेश्या व्यवसाय तूर्तास बंद केला आहे.आनी नगरपालिकेला अतिक्रमण केलेली घरे पाडण्याची कारवाई करण्यासाठी पत्र दिले आहे.
अकोट शहरातील प्रभाग क्रमांक 7 मधिल सोसायटीजीन समोरील टावर जवळ अवैध धंदे,व वेश्या व्यवसाय चालतो. या ठिकानी शहरातील तसेच बाहेर गाववरुन हा व्यवसाय करण्या करिता मुली आणल्या जातात.त्यामुळे या परिसरात सायंकाळ पासुन आबटशौकिनांची गर्दी असते.या सोबतच या ठिकानी ईतर अवैध धंदे चालविले जातात.
या परिसरात लुटमार,जीवघेणे हल्ले,मारामारी,अशा घम्भिर घटना घडत असतात.या गम्भीर प्रकरणा मुळे प्रभाग क्रमांक 7 मधिल त्रस्त सर्व समान्य नागरिक व महिला वर्ग यांनी अनेकदा पोलिसांना तक्रार देऊन काहीही फरक पडला नाही. या परिसरात शाळा विद्यालय तसेच शिकवणी वर्ग असल्याने विद्यार्थी पालक वर्गा मधे सुरक्ष्या विषयी चिंता निर्माण झाली आहे. हा प्रकार लवकर बंद व्हावा या बद्दल पोलिस व प्रश्यासनाने लवकर कारवाई करावी. अशी मागणी विद्याथी, विद्यार्थिनी, महिलांनी केली व अवैद्य धंदे हे कायम स्वरुपी बंद करावे.
अन्याथा तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा निवेदना द्वारे दिला 11 जुन रोजी घटनास्थळी अकोट शहर पोलिस स्टेशन ठानेदार संतोष महल्ले यांना शिवसेना गटनेते नगर सेवक मनिष कराळे यांनी शेकडो महिलांच्या साक्षरिने निवेदन देण्यात आले आहे. अकोट शहर पोलिसांनी तातडीने या परिसरात वेश्या व्यवसाय करण्यार्या तब्बल 25 महिलांनवर कारवाई केली आहे.
12 जुन रोजी सकाळी या परिसराची पोलिसांनी झाडाझडती घेतली.अतिक्रमण केलेल्या जागेवर घरे बांधून वेश्याव्यवसाय करनार्या झोपड्यांना कुलुपे लावण्यास सांगितले.तसेच या परिसरात पोलिस बदोबस्तही लावण्यात आला आहे.
अधिक वाचा : पोलीस पाटील हे साध्या वेशातील पोलिसच – पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola