अकोट(देवानंद खिरकर) -श्री गजानन महाराज पादुका संस्थान,मुंडगाव कडून दरवर्षी प्रमाणे यावर्षीही आषाढी एकादशी निमीत्त पायदळ दिंडी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.वारकरी संप्रदायाचे दैवत विठ्ठल व रुख्मीणी माऊली हे पुर्ण महाराष्टातच मानल्या जाते.या पायदळ दिंडीचे पंढरपुर येथे प्रस्थान अधिक आषाढ शु.7 रविवार दी.9/6/2019 ला होनार आहे.तर आषाढ शु.5 रविवार दि.7/7/2019 ला पंढरपुर प्रवेश होइल.पायदळ दिंडी मुंडगावहून निघुन दि.10/6/2019 ला चोहट्टा मुक्काम दि.11/6/2019 उगवा मुक्काम व दि.12/6/2019 ला सकाळी भोजन अकोट फैल ,अकोला रात्री भोजन व मुक्काम महेश्व्ररी भवन दि.13/6/2019 ला सकाळी फराळ सुपीनाथ नगर,बाळापुर बायपास,रात्रीचा फराळ मुक्काम चोपडे मंगळ कार्यालय चहाचा कारखाना जवळ डाबकी रोड,दि.14/6/2019 ला सकाळी भोजन पुंडलिक बाबा आश्रम,बारा जोतिलींग दिंडी शासकिय दूध डेअरिच्या मागुन इनकम ट्रँक्स चौक,गोरक्षण,सहकार नगर,तुकाराम हास्पीटल,केशव नगर,कौलखेड अशी जाईल रात्री भोजन व मुक्कांम कौलखेड अकोला दि.15/6/2019 ला सकाळी भोजन चांदूर खडकी रात्रीचे भोजन व मूक्कांम कापशी येथे राहिल.पुढे दिंडी पातूर,डव्हा,वाशिम हिंगोली मार्गे पंढरपुर करिता प्रस्थान होइल.तरी भक्तांंना दिंडीत सहभागी होण्याचे आवाहन स्वस्थान व विश्वस्त मंडळाने केले आहे. या दिंडी करिता ज्या भक्तांना अन्नदान करावयाचे असेल त्यांनी स्वस्थानशी संपर्क साधावा.