पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून ७७.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा निकालाचा टक्का कमालीचा घसरला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या १२.३१ टक्क्यांनी कमी आहे. गेल्या काही वर्षांची परंपरा कायम राखत यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे.
यंदा १६ लाख १८ हजार ६०२ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १२ लाख ४७ हजार ९०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे, ८८.३८ टक्के तर, नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी ६७.२७ टक्के लागला आहे. राज्यातील तब्बल १७९४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
निकालाची विभागनिहाय टक्केवारी खालीलप्रमाणे:
पुणे : ८२.४८
नागपूर: ६७.२७
कोकण : ८८.३८
औरंगाबाद : ७५.२०
मुंबई – ७७.०४
कोल्हापूर – ८६.५८
अमरावती – ७१.९८
नाशिक – ७७.५८
लातूर – ७२.८७
अधिक वाचा : नीट परीक्षेचा निकाल जाहीर; सार्थक भट राज्यात पहिला
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola