अकोला (प्रतिनिधी)– रेल्वे स्थानकावरून जात असलेल्या मालगाडीतील डब्याला अचानक आग लागल्याने गाडी स्थानकावर थांबवण्यात आली. ही घटना गुरुवारी रात्री १ वाजेच्या सुमारास घडली. यावेळी अग्निशमन दलाची गाडी वेळीच पोहोचून पाण्याचा मारा केल्याने आगीवर लगेच नियंत्रण मिळवले.
शहरात उन्हाचा कडाका सातत्याने वाढत असून आगीच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशीच एक घटना अकोला रेल्वे स्थानकावर घडली. रेल्वे स्थानकावर एक मालगाडी पोहोचताच कोळशाच्या डब्यातून धुराचे लोळ निघत होते. गाडीच्या डब्यातून धूर निघत असल्याचा प्रकार कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ अग्निशमन यंत्रणेला फोन केला. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. आगीची माहिती वेळीच मिळाल्याने पुढील अनर्थ टळला. कोळशाचा डबा अकोला स्थानकावर असल्यामुळे आगीवर लवकर नियंत्रण मिळवण्यात यश आले. चालत्या गाडीत अशी घटना घडली असती तर मोठी हानी होण्याची शक्यता होती.
अधिक वाचा : मदत न करता अपघाताचे चित्रीकरण करणाऱ्यांवर आता होणार कारवाई
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola