अकोला (प्रतिनिधी) : भारतातील पर्यावरण अतिरेक्यांच्या दुराग्रहामुळे जैव तंत्रज्ञानाचा मार्ग अवरुद्ध झाला आहे.वारंवार विनंत्या करूनही सरकारने या मार्गातील अडथळे दुर केले नाहीत.जैव तंत्रज्ञाननाचे प्रयोग पुन्हा सुरू व्हावेत ह्या शेतकर्याच्या आग्रहाला पाठींबा देत शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी १० जुन रोजी अकोट तालुक्यातील आकोली जहांगीर येथील शेतात HTBt कापुस व वांगे लागवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.अशी माहिती शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते ललित बहाळे यांनी आयोजित पत्रकार परिषेदेत दिली आहे.
या तंत्रज्ञाना मुळे शेतकऱयांच्या उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न वाढीची प्रचंड मोठी संधी निर्माण होऊन शेतकऱयांच्या आर्थिक अडचणी कमी होऊ शकतात मात्र पर्यावरणवाद्यांच्या अतिरेकला बळी पडून सरकार शेतकऱयांची अडवणूक करीत असल्याचा आरोपही ललित बहाळे यांनी केला आहे. जैवतांत्रिकिने (genetic engineering) उत्पादीत जैविकांविषयी मोठा विवाद सुरू आहे. या विवादाचा फटका फार मोठया प्रमाणात शेतकऱ्यांना बसत आहे.शेती व्यवसायात बेण्या बियाण्याच अनन्यसाधारण महत्व आहे.
शेती परवडू नये या धोरणासह सिलिंगच्या कायद्यामुळे बहुतांश शेतकरी अल्पभूधारक झालेला आहेत. या 2- 4 एकरांत उदरनिर्वाह शक्य करायचा प्रयत्न करायचा असेल तर शेतीला जागतीक पातळीवरील अत्याधुनिक ज्ञाना तंत्रज्ञानाची गरज आहे.त्याशिवाय जागतिक पातळीवरील स्पर्धेला तोंड देणे शक्य होणार नाही.असे सांगुन ते पुढे म्हणाले की जैवतांत्रिकीने बेण्या बियाण्यांत वांच्छित गुणगुणांची बेरीज करता येते तसेच अवांच्छित गुणदोष वजा ही करता येतात.
भारतातील पर्यावरण अतिरेक्यांच्या दुराग्रहामुळे जैव तंत्रज्ञानाचा मार्ग अवरुद्ध झाला आहे. वारंवार विनंत्या करूनही सरकारने या मार्गातील अडथळे दूर केले नाहीत.जैव तंत्रज्ञानाचे प्रयोग पुन्हा सुरू व्हावे या हेतुने HTBt (तणनाशक सहनशील कापुस बियाणे) तसेच Bt वांगे पेरणी व लागवणीचा कार्यक्रम शेतकरी संघटनेने हाती घेतला असल्याची माहिती ललित बहाळे यांनी या वेळी दिली. दि.१०जुन रोजी मोठ वावर आकोली जहांगीर ता.अकोट जि. अकोला येथे हा कार्यक्रम होत असुन या कार्यक्रमाला शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांच्या सह विविध शाखेचे सर्व पदाधिकारी उपस्तीत राहतील या वेळी चिंतन प्रबोधन सह भोजन व लागवड पेरणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या पत्रकार परिषददेला शेतकरी संघटनेचे पश्चिम विदर्भ प्रमुख धनंजय मिश्रा,विदर्भ युवा आघाडी प्रमुख डॉ निलेश पाटील सोशल मिडिया प्रमुख विलास ताथोड,शेतकरी संघटना जिल्हाध्य अविनाश नाकट,अकोला जिल्हा अध्यक्ष (माहीती व तंत्रज्ञान आघाडी) शेतकरी संघटना लक्ष्मीकांत कौठकर उपस्तीत होते.
अधिक वाचा : अकोट तालुक्यातील बोर्ड़ी येथे टँकरद्वारे पानीपुरवठा सुरु
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola