प्रतिनिधी (अकोला) : १ जून रोजी मा. पोलीस अधिक्षक साहेब अकोला यांचे विशेष पथक हे रात्री ३:०० वा सुमारास अकोला जिल्हा परीसरात अवैद्ययार कार्यवाही करणे करीता पेट्रोलींग करीता असता त्यांना अनमोरा ता मुर्तिजापुर जि. अकोला चे परीसरात मालवाहू वाहन महेन्द्रा पिकअप बुलेरो ने MH-27-BX-0083 हया गाडीवर संशय आल्याणे त्यांनी सदर गाडीची पाहणी केली असता त्या गाडी मधे महाराष्ट्र प्रतिबंधीत गुटखा चे २५ कट्टे कि अं १८,९०,000 रू चा तसचे मालवाहू वाहन महेन्द्रा पिकअप बुलेरा कि ६,००,००० रू ची असा एकुण २४,९०,000 माल मिळूण आल्याणे तो ताब्यात घेवुन चालक नामे ऐफाज खान एजाज खान वय २४ वर्ष रा.ताज नगर अमरावती तसचे क्लिनर नामे अमिणउल्ला खान शमीउल्ला खान वय २४ वर्ष रा. अकबर नगर अमरावती यांना पुढील कार्यवाही करीता मुर्तिजापुर (ग्रामीण) पोलीसांचे ताब्यात देण्यात आले असुन सदर चा गुटखा हा बडनेरा येथील जावेद नाम व्यक्तीचा असुन तो अकोला येथील अमोल नामक व्यक्ती याचे कड़े जात असतांना ही कार्यवाही करण्यात आली आहे.
नमूद कारवाई मा.श्री. एम. राकेश कलासागर, पोलीस अधीक्षक अकोला तसेच मा. श्री. विकांत देशमूख, अपर पोलीस अधीक्षक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक प्रमुख तसेच कर्मचा-यांनी केली आहे.
अधिक वाचा : उच्चदाब वीज वितरण प्रणालीच्या कामांना गती ५ हजार ५७ शेतकऱ्यांना वीजपुरवठा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola