बाळापूर / वाडेगांव (डॉ चांद) : वाडेगांव येथील काझी पुरा भागात रहाणारे रामेश्वर शंकर सोनटक्के यांनी आपल्या शेतात नवीन नवीन उपक्रम केले असून मागील तिन वर्षापासून त्यांनी सुरन कंद ची शेती कऱ्याला सुरूवात केली असून त्यांनी सुरवातीला ६ गुंटे शेती मध्ये सुरन कंद पेरले त्यांना त्याच्या मध्ये एकून २२ किटंल उत्पादन झाले असून त्याला प्रती किंटल ३०००रू प्रमाने भाव मिळाला असून ६६ हजार रूपयाचे उत्पादन झाले होते .
त्याच प्रमाणे सूरन कंद मध्ये आंतर पिक घेऊ शकता येते या मध्ये गवार, पालक, बीट, शंभार, उळीद, तसेच इतर भाजी पाला घेता येते या पासून पेरणी चा खर्च निघुन जातो व उरवरीत शुद्ध नफा उरतो म्हणून त्यांनी या वर्षी त्यांनी अर्धा एकरात सुरन कंद ची शेती लावली आहे . या वेळी शतीची पाहणी करण्यासाठी कृषी साह्यक उध्दव धुमाळे, प्रभारी मंडळ कृषी अधीकारी एस पी पखाले, शेतकरी रामेश्वर सोनटक्के, देवलाल सोनटक्के, संजय पिपंळे, अनंता सोनटक्के, डॉ चांद, योगेश सोनटक्के , केशव सरप इत्पादी शेतकरी उपस्थित होते. सुरन चे बेने पण त्यांच्या कडे उपलब्ध असून परीसरातील शेतकऱ्यांनी ऐक वेळ भेट देऊन या शेतीचा फायदा घेतला पाहीजे.
अधिक वाचा : एकाच गावात ५० बोअरवेल, भूगर्भातून ओरबाडून काढले जाते पाणी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola