अकोट(देवानंद खिरकर) -पहिला भारतिय दिव्यांग धीरज बंडू कळसाईत याने वयाच्या 22 व्या वर्षी साऊथ आफ्रीकेतिल माऊन्ट किलोमन्जारो हे शिखर 26 जानेवारी 2019 रोजी सकाळी 07.45 ला चढाई पुर्ण केले. या शिखरावर भारताचा राष्ट्रध्वज फ़डकावला व पहिला भारतिय दिव्यांग होण्याचा मान पटकावला. याची दखल इंडिया बुक ऑफ़ रेकॉर्ड ने घेऊन त्याला गौरविन्यात आले. अकोट येथिल धीरज कळसाईत या पहिल्या भारतिय दिव्यांग्याला इंडिया बुक ऑफ़ रेकॉर्ड ने मेडल,पेन,प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला. या कामगिरीमुळे राष्ट्रीय पातळीवर अकोटचे नाव चमकले. किलो मंजारो हा आफ्रिका खंडातील सर्वात उंच पर्वत टान्झानिया देशातील इशान्य भागात केनियाच्या सीमेवर असलेल्या या शिखराची उंची 19 हजार 341 फुट आहे.
विशेष म्हणजे पर्वतरांगेचा भाग नसलेला हा जगातील सर्वात उंच पर्वत असुन बहूतांश भाग बर्फाळ असल्याने हिमखन होत असते. तसेच या पर्वताची सरळ उभी असल्याने वातावरणातिल तापमान व जोराने वाहणारे वारे यच सामना करित धीरज कळसाईतने हे शिखर 26 जानेवारी 2019 रोजी प्रजासत्ताक दिनी पहाटे सर केले होते. शिखरावर पोहचल्यानंतर धीरजने भारत माता की जय,जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवाजी जय भवानी च्या जयघोशात पहाटे तिरंगा फडकवीला. धीरजने या पुर्वी कळसूबाई शिखर, लिंगाना पावनखिंड, तूंगागड, त्रीकोना गड, सुधागड, वजीर सुळका, अशा शिखरावर यशस्वी चढाई केली आहे. इंडिया बुक ऑफ़ रेकॉर्ड मधे नोंद होण्याकरिता त्याला विनोद हरिभाऊ सुरड़कर, बधिरीकिरण तज्ञतज्ञ डॉक्टर राजेंद्र सोनोने, बालरोगतज्ञ डॉक्टर अंजली सोनोने यांनी मार्गदर्शन केले.
अधिक वाचा : सुसंस्कार शिबिरातील विध्यार्थ्यांना दिले अंधश्रध्दा निर्मूलनचे धडे
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola