पातुर (सुनील गाडगे) : टँकरमधून डिझेल,पेट्रोलची चोरी करून त्याची काळाबाजारात विक्री करणाऱ्या टोळीच्या विशेष पोलीस पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक मिलिंद बहाकर हे आज दुपारी छापा मारला. तेथून पोलिसांनी डिझेलचे एक टँकर तसेच खुले डिझेल आणि पेट्रोल जप्त पाच आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईमुळे तेल माफियांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. त्याच प्रमाणे पातूर तालुक्यातील डिझेल-पेट्रोल चोरी करणाऱ्यांची टोळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याच परिसरात डिझेल,पेट्रोल,रॉकेल आणि काळे ऑईल चोरून त्याची काळाबाजारात विक्री करण्याचा गोरखधंदा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. गायेगाव डेपोतून डिझेल,पेट्रोलचे टँकर घेऊन बाहेर पडणाऱ्या टँकर चालकासोबत संगनमत करून आणि नाही ऐकल्यास वाहनचालकाला शस्त्राच्या धाकावर बाजूच्या जंगलात नेले जाते. तेथे टँकरमधून डिझेल, पेट्रोल ड्रम, टाक्या आणि कॅन(डबक्या)मध्ये काढून त्याची नंतर वाहनचालकांना विक्री केली जाते. वर्षांनुवर्षांपासून सुरू असलेल्या या गोरखधंद्यात तेलमाफियांसह अनेक गुन्हेगार सहभागी आहेत. अधूनमधून पोलीस कारवाई करतात. त्यानंतरचे काही दिवस हा गोरखधंदा बंद होतो. पुन्हा काही दिवसांनी तेलमाफिया गुन्हेगारांच्या साथीने हा धंदा सुरू करतात. अशीच एक माहिती विशेष पोलीस पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक मिलिंद बहाकर यांना मिळाली. त्यांनी लगेच कर्मचऱ्याना सोबत घेऊन धाड टाकली. त्यानुसार, आज दुपारी २.३० च्या सुमारास पातूर येथील पातुर वाशिम रिडवरील नॅशनल ढाब्याजळ विशेष पथकाचा ताफा पोहचला. बाजूच्या खुल्या डिझेलचे टँकर उभे होता. त्यातून मोठ्या प्रमाणात डिझेल तर दुसºया टँकरमधून पेट्रोल काढून डबक्यांमध्ये ठेवले होते. आणखी डिझेल काढण्याची तयारी सुरू होती. पॅट ५ आरोपींना अटक करण्यात आली त्यांची नावे,
पाच आरोपी नाव
१.फयाज बेग रज्जाक बेग, वय ३२ वर्ष रा चांदखॉ प्लॉट कब्रस्तान गल्ली अकोला तसेच
२. अब्दूल जावेद अ.रषीद वय २१ वर्ष रा.मुजावरपूरा पातूर
३. अकबर खान अख्तर खान रा अषोक नगर, पुरपिडीत कॉलनी अकोट फाईल
४. विजय संदानद मौर्य,वय ४० वर्ष रा.शंकरनगर अकोट फाईल अकोला
५.नाजीमोद्दीन अनीसोद्दीन वय २० वर्ष रा.जिराबावडी, खदान यांना रंगेहात जेरबंद करण्यात आलेण् प्राप्त माहितीनुसार ८ टाक्या तसेच
जप्त केलेला मुद्देमाल
1.एक लोखंडी ड्रम ज्यामध्ये 120 लिटर पिवळसर रंगाचे उग्र वास असलेले डिझेल एकूण किंमत 9900/-रूपये
2. डिझेलचे रिकामे लोखंडी ड्रम ज्यामधून डिझेलचा उग्र वास येत असलेले – 08 नग एकूण किंमत 13500/-
3.प्लॉस्टीकचा हिरव्या रंगाचा 200 लिटर मापाचा एक कोठी किंमत अंदाजे 1000/-रूपये
4.प्लॉस्टीक बॅरल, निळा रंग व हिरव्या रंगाच्या -02 किंमत 1000/-रूपये
5.डिझेल काढण्यासाठी उपयोगी एक लोखंडी कॉक असलेला प्लॉस्टीक पाईप किंमत अंदाजे 500/-रूपये
6.एक पाच लिटरचे लोखंडी माप किंमत अंदाजे 500/-रूपये
7.एक हिरव्या रंगाचा फोस पाईप, एक निळया रंगाची लोखंडी चाळी, एक पिवळया रंगाची प्लॉस्टीकची चाळी, एक केसरी रंगाची प्लॉस्टीक बकेट सर्वाची एकत्र किंमत 500/-रूपये
8.पिवळया रंगाचा प्लॉस्टीकच्या 05 कॅन किंमत अंदाजे 500/- रूपये जप्त करण्यात आल्या आहेत
या कारवाई नंतर पातूर पोलिसात जीवनावश्यक वस्तु अधिनियम कलम 3,7,अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राकेष कलासागर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक प्रमुख पो.नि. मिलींद कुमार बहाकर,व टिमने ही कार्यावाही केली आहे. या कार्यवाही मुळे पातुर पोलीसांची हप्ते खोरी चव्हटयावर आली असुन या प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक काय कार्यवाही करतात या कडे सर्व जिल्हयांचे लक्ष लागले आहे.
अधिक वाचा : एकाच गावात ५० बोअरवेल, भूगर्भातून ओरबाडून काढले जाते पाणी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola