अकोला (प्रतिनिधी)– अर्धवट जळालेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. ही घटना न्यू तापडिया नगरातील नवनाथ महाराजांच्या मंदिर परिसरात उघडकीस आली. सिव्हील लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही 15 दिवसातील तिसरी खळबळजनक घटना आहे. या तरुणाचा खून करुन मृतदेह येथे फेकण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
न्यू तापडिया नगरातील नवनाथ मंदिर परिसरात पोलीस पाटील गणेश अडकणे व त्यांचे सहकारी फिरत होते. त्यावेळी त्यांना तिथे अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला. त्यांनी सिव्हील लाईन पोलीस ठाण्याला याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून परिसराची पाहणी केली. घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. घटनास्थळी श्वान पथक आणि मोबाईल कारही दाखल झाली.
मृतदेह अर्धवट जळालेला असून त्याच्याजवळ एक स्लीपर सापडली आहे. हा खून असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. मृताची ओळख आद्यप पटू शकली नाही. यासंदर्भात पोलिसांकडून मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहा दिवसांपूर्वी किसनराव हुंडीवाले यांचा 6 मे रोजी चॅरिटी कमिश्नर कार्यालयात खून झाला होता. त्यानंतर 9 मे रोजी त्याच कार्यालयातील सफाई कर्मचारी मोहन संकत यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
अधिक वाचा : केळीवेळी येथे नवजात अभ्रकाला नाल्यात फेकून निर्दयतेचा कळस गाठणाऱ्याना ५ जणांना गुन्हे शाखेने ठोकल्या बेळया
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola