अकोला(प्रतिनिधी)- दहिहांडा पोलिसस्टेशन अंतर्गत येत असलेल्या अकोट तहसील मधील केळीवेळी परिसरात एका नाल्यात फेकलेल्या नवजात शिशु प्रकरणी आज स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना यश आले असून या प्रकरणातील एकूण 5 आरोपींना अटक करून दही हंडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
गेल्या 30 एप्रिल रोजी दहिहांडा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अकोट तहसील मधील केळीवेळी परिसरात एका नाल्यात मृतावस्थेत नवजात शिशुचा मृतदेह आढळून आला होता घटनेची माहिती मिळताच दहिहांडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रेमानंद कात्रे आपल्या ताफ्या सह घटना स्थळी पोहचून पंचनामा करून त्या नवजात बालिकेचा मृतदेह शव विच्छेदन करण्यासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविला होता या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करून तपास प्रारंभ केला होता या दौरान जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख शहर उपविभागीय अधिकारी उमेश माने पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. कैलास नागरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक छाया वाघ, ए एस आय दिनकर बुंदे, पो कॉ. संदिप काटकर ,पो.कॉ. भावलाल हेंबाडे , म.पो.काँ भाग्यश्री मेसरे, यांनी उघडकीस आणला. गुन्हे शाखा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास केला असता नवजात बालिकेचा मृतदेह फेकण्या प्रकरणात प्रेमी शेख कलीम शेख जलील, गर्भपात करणारे डाक्टर बलराम मंडल, युवती ची माता खातून बी कय्यूब शहा, पिता कय्यूम शाह चांद शाह तथा युवतीला अटक करून दहिहांडा पोलीस यांच्या ताब्यात आरोपी दिले आहेत पुढील तपास दहीहंडा पोलीस करीत आहेत.
ग्राम केळेवेळी येथे जवळपास ६ महिन्याच्या स्त्री जातीच्या अभ्रकाला आदर्श नगर मध्ये एका सांडपाण्याच्या नालीमध्ये फेकून देऊन निर्दयतेचा कळस गाठला होता.या संदर्भात अवर अकोला न्युज ने सर्वप्रथम वाचा फोडली होती.हे विशेष
आधीची बातमी –ब्रेकिंग- ग्राम केळीवेळी येथे निर्दयतेचा कळस सांडपाण्याच्या नालीत फेकले ६ महिन्यांचे अभ्रक