तेल्हारा(प्रतिनिधी)– बालवयात विद्यार्थ्यांना चांगले वळण लावण्यासाठी व त्याचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी उन्हाळ्यात बालसंस्कार शिबीर घेणे काळाची गरज आहे. ते महत्व काम वारी भैरवगड येथील ज्ञानेश आश्रमचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज वाघ करीत असल्याचे प्रतिपादन तेल्हारा पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी दिनांक ६ एप्रिल रोजी शिबीराला सदिच्छा भेटी दरम्यान बोलताना केले. यावेळी व्यासपीठावर वारी भैरवगड येथील ज्ञानेश आश्रमचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज वाघ तेल्हारा पोलीस स्टेशनचे राजु इंगळे अविनाश म्हसाये श्रीपत विखे हिंगणी चे अतुल वाघ यांची उपस्थिती होती.
तेल्हारा तालुक्यातील वारी भैरवगड येथे १ मे पासून श्री माऊली सर्वांगीण विकास बाल संस्कार शिबीराचे आयोजन केले आहे. या शिबिरामध्ये परिसरातीलच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विद्यार्थी शिबीरामध्ये दाखल झाले आहे. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना धामीक शिक्षणासोबतच सर्वच प्रकारचे चांगले संस्कुरीत शिक्षण देण्यात येत आहे. या शिबिरामध्ये परिसरातील मान्यवरांच्या भेटी होत आहे. निसर्ग रम्य वातावरणात होत असलेल्या या शिबिराचा आनंद विद्यार्थी घेत आहेत. यावेळी बोलताना शिबीर प्रमुख ज्ञानेश्वर वाध यांनी शिबीर घेण्याचा उद्देश आणि शिबीरामध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा व ज्ञानदानाचे महत्त्व याबाबत माहिती दिली यावेळी उपस्थित मान्यवरांचा आश्रमाच्या वतीने सत्कार केला.
अधिक वाचा : येणाऱ्या काळामध्ये भारतीय संस्कृतीला जोपासण्याची अत्यंत आवश्यकता असे मत अँड. श्रीमती अपर्णाताई रामतीर्थकर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola