बेलखेड (चंद्रकांत बेंदरकार) : दिनांक – 03/05/2019 रोजी श्री. गजानन महाराज मंदिर तथा समस्त गावकरी मंडळी बेलखेड यांच्या सहकार्याने जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यातील एक अनुभव सांगतांना असे म्हटले की, आजची परिस्थिती फार वेगळी आहे, त्यांनी ब्रेड वरून झालेल्या घटस्फोटाबाबतीत भाष्य केले तेव्हा एक जोडप्या मध्ये ब्रेड वरून कसा वाद झाला आणि तो कसा घटस्फोटापर्यंत आला हे अतिशय छान अशा पद्धतीत वर्णन करून सांगितले व आजची समाजव्यवस्था कशी खिन्न झाली आहे.
घराघरांमध्ये आज वाद पाहायला मिळतात हे चित्र बदलले पाहिजे असे परखड मत त्यांनी व्यक्त केले व त्यांनी स्त्रियांवर भाष्य करतांना असे म्हटले की स्त्रियांनी फॅशन करतांनाच सोबत शिक्षण पण करावे व आपल्या घराविषयी काही जबाबदाऱ्या आहेत हे देखील लक्षात ठेवावे मुलींनी शैक्षणिक कार्य करतांना स्वयंपाक घरापर्यंतच्या कार्यात पण त्यांचं योगदान असावं व त्यांनी त्यांच्या अस्तित्वालाच आपलं करिअर मानावं असं मत त्यांनी त्यांच्या व्याख्यानातून सांगितले. व उद्योजक महिलांचे सत्कार कार्यक्रमाच्या वेळी आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ. ज्योतीताई गोमासे सरपंच ग्रामपंचायत बेलखेड प्रमुख अतिथी म्हणून सौ.जयश्रीताई फुडकर नगराध्यक्ष तेल्हारा सौ आशाताई ओमप्रकाश इंगळे सभापती पंचायत समिती तेल्हारा सौ.पद्मावतीताई कोल्हे सावित्रीबाई कन्या विद्यालय बेलखेड मुख्याध्यापिका श्री. भवानीप्रताप देशमुख श्री. प्राध्यापक राम देशमुखसर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
अधिक वाचा : अकोल्यात १२ लाखांच्या सुगंधित सुपारीसह दोन जण ताब्यात