सकाळी साडेआठच्या सुमारास फॉनी (किंवा फानी) चक्रीवादळ ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकलं आहे. सतर्कतेचा इशारा म्हणून आधीच हजारो लोकांना पूर्व किनाऱ्यावरील खेड्यांमधून हलवण्यात आलं आहे.
200 किमी प्रतितास वेगाने येत असलेलं चक्रीवादळ शुक्रवारी सकाळी 8 वाजता धडकलं, असं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फनी’ या चक्रिवादळाचा परिणाम म्हणून महाराष्ट्रावर पूर्वेकडून वारे वाहत आहेत. या वाऱ्यासह हवामानातील बदलामुळे राज्यात ठिकठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात किंचित अंशी घट नोंदविण्यात येत असल्याचा दावा हवामान खात्याने केला असून, आणखी ४८ तास हीच अवस्था कायम राहील, असा अंदाज वर्तवला आहे. महत्त्वाचे म्हणजे ४ मे रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.
ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये ताशी 50 किमीचे वारे वाहत असून पावसाच्या सरीही पाहायला मिळत आहे. सावधानतेचा इशारा म्हणून भुवनेश्वर विमानतळ मध्यत्रीपासून बंद करण्यात आलं आहे. तसंच ओडिशा सरकारने पूर्व किनाऱ्यावरील दोन महत्त्वाच्या बंदरातील कामकाज थांबवलं आहे. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्येही हाय अलर्ट देण्यात आला आहे.
आतापर्यंत 8 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवल्याचं अधिकाऱ्यांनी बीबीसीला सांगितलं आहे. फॉनीच्या मार्गात असणाऱ्या पुरी शहरात जवळपास एक लाख लोक राहातात. पुरीमध्ये 858 वर्षं जुनं जगन्नाथाचे मंदिर असून त्याचंही नुकसान होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
अधिक वाचा : मोहम्मद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola