अकोट (देवानंद खिरकर)– जिल्ह्यातील पोलीस हे लाच घेण्यात अग्रेसर असल्याचा प्रत्यय वारंवार येत आहे काही दिवसांपूर्वी च दहीहंडा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलिसांनी वाळू वाहतूक करणाऱ्या इस्माकडून लाच घेतली असल्याने 2 पोलीस यांचेवर कारवाई झाली होती.
ती घटना लोकांच्या समरणातून जात नाही तोच आज अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत पोलिस याने तक्रारदार महिलेसह तिच्या कुटुंबातील इतर 3 सदस्य यांना फौंजदारी कारवाईमधून टाळण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत अकोला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार झाल्यावर लालुप्र विभागाचे तक्रारीची शहानिशा केली असता तक्रारी मध्ये सत्यता आढळून आल्याने आरोपी पोलीसहवा हशमत खान दाऊदखान पठाण, ब.न.१०२४, पो.स्टे. अकोट ग्रामीण याला आज कारवाई च्या सापळ्यात अडकविण्यात यश आले आहे. तक्रारदार व तिच्या कुटूंबातील इतर ३ इसम असे चौघांवर फौजदारी कारवाई करण्याची धमकी देऊन सदर कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी आरोपीने केल्याबाबत तक्रार दाखल झाली होती. त्या तक्रारीची पडताळणी आज दि: २८/३/२०१९ रोजी करण्यात आली आहे. त्यामध्ये आज तडजोडीअंती ₹ २०००० देण्यात आली आहे. त्यावेळी आरोपीला तक्रारदारावर संशय आल्याने त्याने रक्कम घेतली नसली तरीही सदरची कार्यवाही करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संजय गोर्ले, पोलिस निरीक्षक ईश्वर चव्हाण व इतर कर्मचारी, लाप्रवि,अकोला यांनी केली आहे आरोपीवर गुन्हा दाखल प्रक्रिया सुरू आहे.
अधिक वाचा : अकोला वैध मापन शास्त्र कार्यालयाचा निरीक्षक ७ हजाराची लाच घेतांना ए. सी. बी. च्या जाळ्यात
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola