तेल्हारा (प्रतिनिधी): तेल्हारा तालुक्यातील मनब्दा या गावात पाणी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेला सात एप्रिल पासुन सुरवात झाली आहे. राज्यात दुष्काळ वाढतच चाललय गावातील दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यभरात श्रमदान सुरु झालाय. परंतु कुठलाही हेतू किंवा स्वार्थ न ठेवता मनब्दा गावातील नागरिक श्रमदान करीत आहेत गावातील प्रचंड उत्साह पाहात गावाने पहिल्या टप्प्यातच गावाचे २० मार्क पुर्ण केले आणि स्नेहालय संस्थेच्या माध्यमातून एक लाखाचे मदत मिळाली.
मनब्दा गावात पाणी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा मध्ये सहभागी होऊन माघील वर्षी शोष खंड्डे, वृक्षरोपन, विहिर पुनर्रभरन, बांध, नदी खोली करण, माती परीक्षण, रोपवाटीका, शेत तळे, गाव तलाव, आणि अनेक कामे करण्यात आल्याने माघील वर्षी मनब्दा गावाने तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस घेतले वॉटर कप स्पर्धा २०१९ मध्ये सुध्दा ग्रामस्तांनी भाग घेतला. गावाचा फायदा झाल्याने गावातील पाण्याचा स्रोत वाढला गावातील ग्रामस्त याही वर्षी वाटर कप स्पर्धेत सहभागी होऊन मोठ्या प्रमाणे श्रमदान करीत आहेत.
अधिक वाचा : लोकजागर मंचातर्फे शिवजयंतीच्या पर्वावर बालशिवाजी वेशभूषा स्पर्धा,शिव अभिवादन सोहळा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola