तेल्हारा (विशाल नांदोकार) : तालुक्यातील भांबेरी येथील 27 वर्षीय शेतकरी युवकाची राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी 1 वाजेच्या दरम्यान घडली आहे.
तालुक्यातील ग्राम भांबेरी येथील युवा शेतकरी मंगेश विठठल सरोदे वय 27 वर्ष या युवकाची वडिलोपार्जित दोन एककर शेती ही भांबेरी शिवारात असून शेती पाहण्याचे काम करीत होता. आज दुपारी जवळपास1 वाजेच्या दरम्यान सदर युवा शेतकऱ्यांने आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून जीवन यात्रा संपवण्याचा प्रयत्न केला असता गावातील काही नागरिकांना या बाबत माहिती मिळाली असती त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मंगेश यास उपचारासाठी तेल्हारा येथे घेऊन जात असताना ग्राम थार येथे मंगेश याची प्राणज्योत मावडली.
तेल्हारा ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ अशोक तापडिया यांनी मृत घोषित केले. सदर युवकाच्या वडिलांनी त्यांच्या शेतीवर एक वर्षाआधी एका खाजगी बँकेचे कर्ज काढले होते. वडिलांचे निधन झाल्यानंतर सदर कर्जाचे डोंगर शेती पाहणाऱ्या व शेती संभडणार्या मंगेश या युवा शेतकऱ्यावर येऊन ठेपले होते, त्या कर्जाच्या डोंगरामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या युवा शेतकऱ्याने आज आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली.
याबाबत तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार नागोराव भांगे, सागर मोरे यांनी पंचनामा करून सदर मृतदेशाचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात येणार आहे. मंगेश या युवा शेतकऱ्याच्या आत्महत्येणे तेल्हारा तालुक्यासह भांबेरी गावात हळहळ व्यक्त होत आहे.
अधिक वाचा : महापुरुषांचे फोटो डोक्यावर घेतल्या पेक्षा त्यांचे विचार डोक्यात रुजवा- डॉ ऊध्दव राव गाडेकर.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola