अकोला (प्रतिनिधी) – निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी त्यांच्या कार्यालयात तयार केलेल्या वॉर रूममध्येच गुरुवारी संपूर्ण दिवस तळ ठोकला होता. प्रत्येक घडामोडीवर त्यांनी बारीक लक्ष ठेवले. तसेच कुठल्याही तक्रारीसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्या तक्रारी तत्काळ निकाली काढण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. प्रत्येक मतदान केंद्रावरील आढावाही त्यांनी या रूममध्ये बसून घेतला.
मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली, तेव्हापासून तर सायंकाळी मतदान प्रक्रिया बंद होईपर्यंत तीन तक्रारी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामध्ये पळसो बढे येथील कृष्णा बढे हे जिवंत असतानाही यांचे नाव मतदार यादीत नसणे, त्यांचे नाव मतदार यादीत डिलीट झाल्याबाबतची तक्रार होती. या तक्रारी बाबत सविस्तर अहवाल आयोगाला सादर करण्यात येणार आहे. त्यांच्याकडील कागदपत्रांची तपासणी करून त्यासंदर्भातील प्राथमिक अहवाल आयोगाकडे पाठविण्यात आला आहे. तर दुसरी तक्रार ही बाळापूर तालुक्यातील कवठा येथील मतदान केंद्रावरील आहे. येथे श्रीकृष्ण घ्यारे यांनी बॅलेट युनिटची तोडफोड केली. उरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. तिसरी घटना ही अकोला पूर्व मतदारसंघात गुडधी येथील 136 मतदान केंद्रावर व्हीव्हीपीपॅट मशीन बंद झाल्यामुळे ते मशीन तातडीने बदलण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी पापळकर यांनी दिली.
मतदान सुरू झाल्यानंतर 10 बियू आणि 10 सीयू आणि 24 व्हीव्हीपॅट, आशा 1 टक्के मशीन बदलाव्या लागल्या. तर मोकपोलदरम्यान 24 बियू, 26 सीयू आणि व्हीव्हीपट 63 मशीन बदलाव्या लागल्या. दिव्यांग मतदार मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. 50 टक्क्यांच्यावर त्यांची मतदान येत आहे. मतदान संपल्यानंतरची एकूण मतदानाची आकडेवारी ही आमच्याकडे असलेल्या ट्रेंड आणि झोनल अधिकारी यांच्या माहितीच्या आधारे 60 टक्केदरम्यान मतदान राहील, असा अंदाज निवडणूक निर्णय अधिकारी पापळकर यांनी व्यक्त केला आहे. मशीन बदलण्याचा कालावधी एक तासाच्या आत एकाच ठिकाणी बदलण्यात आल्या आहेत. इतर ठिकाणी त्यानं 15 मिनिटात बदलण्यात आल्या आहेत. मतदार यादीत नावे नसल्याच्या तक्रारी अनेक मतदान केंद्रांवरून आल्या आहेत. त्यांना 1950 क्रमांकावर सम्पर्क साधून तक्रारी नोंदविण्याचे सांगून आपले नाव तपासून घावे, नाव नसल्यास फॉर्म 6 नंबर भरून पुढच्या निवडणुकीसाठी आपले नाव नोंदविता येईल. पोस्टल बलेट हे 23 मेच्या पहाटे 6 वाजेपर्यंत येत राहणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola